________________
तत्वार्थसार
अर्थ- वर्तमान पर्यायाने युक्त द्रव्याला त्या पर्यायमुखाने ग्रहण करणे तो भावनिक्षेप होय. जसे राज्यपदावर आरूढ असलेल्यास राजा म्ह गणे. नामनिक्षेप, स्थापनानिक्षेप, द्रव्यनिक्षेप या मध्ये कालवाचक भेद अपेक्षित नसतो म्हणून या तीन निक्षेपात द्रव्याथिकनयाची प्रधानता असते. भाव निक्षेपात वर्तमानपर्यायविशिष्ट द्रव्याची प्रधानता असते तेव्हा तो द्रव्याथिकनयाचा विषय असतो. जेव्हा पर्यायाची प्रधानता असते तेव्हा तो पर्यायाथिकनयाचा विषय असतो.
'अप्रकृत (अविवक्षित) चे निवारण करून प्रकृत (विवक्षित)चे प्ररूपण करण्यासाठी वक्ता व श्रोता याना कोणताही संदेह राहू नये यासाठी हे निक्षेपज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक वाक्प्रयोग हा निक्षेपपूर्वक, विवक्षित अभिप्रायपूर्वक असतो. निक्षेपरूप विवक्षित अभिप्राय समजल्याशिवाय आगमव वनाचा खरा अभिप्राय लक्षात येत नाही.
तत्त्वार्थ जाणण्याचा उपाय तत्त्वार्थानः सर्व एवैते सम्यक्बोधप्रसिद्धये । प्रमाणेन प्रमीयन्ते नीयन्त च नयस्तथा ॥१४॥
अर्थ- जीव अजीव आदि तत्त्वार्थाचे हेय उपादेय स्वरूप यथार्थ जाणण्यासाठी प्रमाण-नय-निक्षेप हे उपाय आहेत. प्रमाणाने वस्तूच्या सर्व अंशाचे यथार्थ ज्ञान होते. या प्रमाणाने जाणलेल्या वस्तूचे नामादि निक्षेप विवक्षापूर्वक एक एक अंशाचे ग्रहण करणे किंवा कथन करणे ते नयज्ञान-अंशज्ञान होय. हे नयज्ञान स्यात पदाने अंकित असल्यामळे वस्तूचे विवक्षित एक अंश मखाने कथन किंवा ग्रहण करते तथापि त्यामध्ये वस्तूच्या अन्य अविवक्षित अंशाची मान्यता गौण रूपाने अभिप्रेत असते म्हणून हे नयज्ञान जरी एकांश-एकांत धर्म कथन असते तरी तो सम्यक एकांत म्हटला जातो. कारण त्यामध्ये दुसया नयाने वस्तूच्या दुसऱ्या अंशधर्माची मान्यता अभिप्रेत असते.
टोप-१ अप्रकृतनिवारणार्थ, प्रकृतनिरूपणार्थ, संदेहव्यभिचारनिवृत्यर्थं च निक्षेपः
अधिक्रियते।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org