________________
तत्त्वार्थसार
संकेत केला जातो तो नामनिक्षेप होय. जसे एकाद्या मुलाचे नाव महावीर ठेवणे.
स्थापना निक्षेप सोऽयमित्यक्षकाष्ठादौ संबंधेनान्यवस्तुतः । यद् व्यवस्थापनामात्र स्थापना साऽभिधीयते ॥११॥
अर्थ- आकार, गुण, क्रिया आदि सादृश्य संबंधावरून अन्यवस्तूचा अन्यवस्तूमध्ये ‘तो हा आहे' अशी कल्पनामात्र करणे यास स्थापनानिक्षेप म्हणतात. जसे बुद्धिबळातील प्यादे या मध्ये घोडा, हत्ती, उंट इत्यादि कल्पना करणे, माती, लाकडाच्या चित्रामध्ये हा बैल आहे, हा घोडा आहे अशी कल्पना करणे तो स्थापनानिक्षेप होय. याचे दोन भेद आहेत.
१) तदाकार स्थापना- महावीराच्या मूर्तीमध्ये महावीराची स्थापना करणे.
२) अतदाकार स्थापना- तांदळाचे स्वस्तिक काढून त्यात भगवंताची स्थापना करणे.
द्रव्यनिक्षेप भाविनः परिणामस्य यत् प्राप्ति प्रति कस्यचित् । स्याद् गृहीताभिमुख्यं हि तद् द्रव्यं ब्रुवते जिनाः ॥१२॥
अर्थ- भावी पर्यायरूपाने परिणमनास उन्मुख अशा द्रव्याला त्या पर्यायमुखाने ग्रहण करणे तो द्रव्यनिक्षेप होय. जसे राजपुत्राला राजा म्हणणे अथवा राज्यभ्रष्ट पुरुषाला राजा म्हणणे.
भावनिक्षेप वर्तमानेन यत्नेन पर्यायेणोपलक्षितं । द्रव्यं भवति भावं तं वदन्ति जिनपुंगवाः ॥१३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org