SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 53
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार जीवाची शुद्ध चेतनारूप ज्ञान-दर्शनरूप परिणति हीच जीवाला सर्वथा उपादेय आहे. प्रश्न- येथे शिष्य प्रश्न करतो की, जर जीवत्त्व सर्वथा उपादेय आहे असे मानले तर मिथ्यादृष्टीचे जीवत्त्वही उपादेय मानण्याचा प्रसंग येईल. उत्तर- या प्रश्नाचे उत्तर धवलाकार आचार्य वीरस्वामीनी दिले आहे की, मिथ्यादृष्टीचे मिथ्यात्व अमंगल असेल ते उपादेय ठरणार नाही पण त्यामध्ये असणारे जे जीवत्व ते तर सदा मंगलरूप उपादेय आहे. अजीव तत्त्वाला सर्वथा हेय म्हटले आहे. व्यवहार नयाने कर्म-नोकर्म रूप अजीव तत्त्वाचा संयोग संसार दुःखाचे कारण असल्यामुळे त्याला हेय म्हटले आहे. पण वास्तविक निश्चयाने कर्म-नोकर्मरूप पुद्गलद्रव्यदेखील जीवाला हेय किंवा उपादेय नाही. अध्यात्मदृष्टीने ज्या परद्रव्याचे हा जीव ग्रहणच करू शकत नाही त्याचा त्याग तरी कसा करणार? म्हणून येथे प्रामुख्याने कर्म-नोकर्माच्या संयोगात होणारे जीवाचे जे राग द्वेषादि विकारभाव त्याला अचेतन भाव-अनात्मभाव अजीवतत्त्व म्हणन त्याला हेय म्हटले आहे. प्रथम विकार भावाचा त्याग झाल्याशिवाय कर्म नोकर्माचा अभाव होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये देखील कर्मबंध जीवाला मूर्त म्हटले आहे. ' समानशीलव्यसनेषु सख्यं ' जीव जेव्हा आपला जीवपणा सोडून भावरूपाने राग-द्वेषादिरूप अचेतनभाव धारण करतो तेव्हा त्याचे कर्म-नोकर्माशी सख्य होते, बंध होतो. म्हणून येथे प्रामुख्याने जीवाची अचेतन भावरूप परिणति तिला अजीव तत्त्व म्हणून हेय म्हटले आहे. जे हा हा जीव अजीवतत्त्वरूप परिणति करतो तेव्हा याचे भाव आस्रव-भाव बंधरूप परिणाम होतात. म्हणून आस्रव-बंध हा अजीवतत्त्वाचा विशेष विस्तार आहे अत एव तो हेय आहे. जेव्हा हा जीव आपल्या जीवत्त्व रूपाने रत्नमयधर्म रूपाने परिणति करतो तेव्हा जीवाचे Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy