________________
तत्त्वार्थसार
'नव-तत्त्व गमत्वेऽपि यदेकत्वं न मुञ्चति' या आगमवचनावरून एक अशुद्ध जीवच कर्म-नोकर्माच्या संयोगात ही नवरूपे धारण करतो. म्हणून कर्म-नोकर्माच्या संयोग व वियोगात जीवाने तावत्काल धारण केलेली ही रूपे जीवाचे परमार्थ स्वरूप नाही. याना परभाव-परसमय अत एव हेय मानून ही नवतत्त्वे धारण करणारा या नवतत्त्वात अन्वयरूपाने सदा विद्यमान असणारा जो कारण परमात्मा तोच जीवाला उपादेय आहे. असे जे जीव-अजीव तत्त्वाचे, आत्म-अनात्मतत्त्वाचे हेयउपादेय रूपाने यथार्थ श्रद्धान त्याला तत्त्वार्थ श्रद्धान लक्षण सम्यग्दर्शन म्हटले आहे.
अध्यात्मदृष्टीने कर्म-नोकर्मरूप पुद्गल द्रव्यदेखील जीवाला केवळ ज्ञेयच आहे. हेय किंवा उपादेय नाही. कर्माचा बंध किंवा क्षय हे जीवाचे कार्य नाही. जीव त्याचा कर्ता नाही. (अन्वय-व्यतिरकगम्यो हि कार्य-कारण भाव:) ज्याचा ज्याचेशी अन्वय-व्यतिरेक असतो त्या दोहोमध्ये कर्ता-कर्मभाव, कार्य-कारणभाव' मानला आहे. अन्वय-व्यतिरेक रूप व्याप्ति एकाच द्रव्याच्या जीवाच्या दोन विभावपरिणामामध्ये मानली आहे. जीवाचा पूर्वपरिणाम कारणरूप असतो व उत्तर परिणाम त्याचे कार्य असतो. त्यामुळे कार्य-कारण भावामध्ये नियत क्रमबद्ध व्यवस्था सुव्यवस्थित आहे. क्रमबद्धपर्यायकाल अक्रम-मागे पुढे कदापि होत नाही. ज्या द्रव्याचा जो परिणाम नियत कारणरूप असतो अशी वस्तुव्यवस्था नियम क्रमबद्ध आहे.
जे ज्या द्रव्याचे जन्म किंवा मरण, सुख, दुःख जेथे ज्या कारणाने ज्या प्रकाराने ज्या देशामध्ये ज्या कालामध्ये नियत आहे तेच केवलीभगवंताच्या ज्ञानात झळकते. ते तेथे त्याच कारणाने त्या देश-कालामध्ये टीप- १ व्याप्य व्यापकता तदात्मनि भवेत् नैवातदात्मन्यपि ।
व्याप्य- व्यापकभाव संभवमते का कर्त-कर्म स्थितिः । २ जं जस्स जेण जत्थ वि जेण विहाणेण जम्मि देसम्मि ।
णादं जिणेण णियदं जम्म वा अहव मरणं वा ।। १॥ तं तस्स तेण तत्थ वि तेण विहाणेण तम्मि देसम्म । णो सक्कदि वारेदं इंदो वा तह जिणिदो वा । (कार्तिकेयानुप्रेक्षा)
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org