________________
तत्त्वार्थसार
जीवाच्या वीतराग भावालाच चारित्र म्हणतात. दर्शन मोह व अनंतानुबंधीच्या अभावात वीतरागतेचा प्रारंभ चवथ्या गुणस्थानापासून होतो. स्वरूपे चरणं चारित्रं आत्मस्वरूपात रमणता यालाच चारित्र म्हणतात. आत्मस्वरूप प्रवृत्ति व विषयापासून निवृत्ति असे चारित्राचे दोन भेद आहेत. यद्यपि व्रत-संयमरूप चारित्र चवथ्या गुणस्थानात नसते तथापि स्वरूपामध्ये प्रवृत्ति आत्मानुभूतिरूप चारित्र हे सम्यग्दर्शनाशी अविनाभावी असते. सम्यग्दर्शन' ज्ञान-चारित्र हे आत्म्याचे स्वरूप आहे. रत्नत्रय धर्म आत्मधर्म आहे. आत्म्याला सोडून अन्य द्रव्यामध्ये तो आढळत नाही. म्हणून रनत्त्रय संपन्न आत्माच साक्षात् मोक्षमार्ग व तोच साक्षात् मोक्ष होय.
सम्यग्दर्शनादिकाचे स्वरूप श्रद्धानं दर्शनं सम्यग्ज्ञानं स्यादवबोधनं ।
उपेक्षणं तु चारित्रं तत्त्वार्थानां सुनिश्चितं ॥४॥
अर्थ- जीव अजीव आदि सात तत्त्वांचे हेय उपादेय रूपाने जे यथार्थ श्रद्धान ते सम्यग्दर्शन. सात तत्त्वांचे हेय उपादेयरूप जे समीचीन ज्ञान ते सम्यग्ज्ञान व जीव-अजीव आदि सात तत्त्वाविषयी परम उपेक्षाभाव राग-द्वेष रहित परम समताभाव वीतरागभाव त्यालाच सम्यक चारित्र म्हणतात.
मोक्षशास्त्रातील 'तत्त्वार्थश्रद्धानं सम्यग्दर्शनं' या सूत्राचे मर्म स्पष्ट करताना समयसार ग्रंथात सांगितले आहे की
तीर्थप्रवृत्ति निमित्त हेय उपादेय रूपाने सांगितलेल्या जीव अजीव आदि सात तत्त्वाना भूतार्थनयाने अभूतार्थ अपरमार्थ समजून याना जीवाचे परमार्थ स्वरूप न समजता हे जीवाने तावत्काल धारण केलेले
टीप १- रयणत्तयं ण वट्टइ अप्पाणं मुयदु अण्ण दवियम्मि ।
तम्हा तत्तिय मइओ होदि हु मोक्खस्स कारणं आदा । (द्रव्यसंग्रह) २- भूयत्थेणाभिगदा जीवाजीवा सपुण्णपावा य ।
आसव संवर-णिज्जर बंधो मोक्खोय सम्मत्तं ॥ (समयसार)
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org