________________
तत्त्वार्थसार
मार्गदर्शक एक अद्वितीय दीपक आहे. यद्यपि हा पूर्वाचार्य प्रणीत प्रसिद्ध आहे तथापि भव्य मुमुक्षु जीवांच्या कल्याणासाठी विशद रीतीने जीवअजीव आदि सात तत्त्वामध्ये सारभूत जो कारण परमात्मा की ज्याच्या आश्रयाने आत्मा परमात्मा बनतो त्याचे वर्णन या ग्रंथात केले आहे. विषय प्रतिज्ञा
स्यात् सम्यग्दर्शन- ज्ञान-चारित्रत्रितयात्मकः । मार्गो मोक्षस्य भव्यानां युक्त्यागमसुनिश्चितः ॥ ३ ।।
"
अर्थ- सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र या तिघांची एकता व पूर्णतास्वरूप मोक्षाचा मार्ग की जो युक्ति व आगमप्रमाण यानी निर्दोष-सुनिश्चित प्रसिद्ध आहे त्याचे वर्णन भव्यजीवांच्या कल्याणासाठी या ग्रंथात सांगितले आहे.
संसार हा रोगस्वरूप आहे. ज्याप्रमाणे रोगाचा नाश होण्यासाठी रोगनाशक औषधाचे यथोचित ज्ञान - श्रद्धान व त्या औषधाचे सेवन हे तिन्ही नितांत आवश्यक असतात त्याप्रमाणे संसाररूपी रोगापासून मुक्त होण्यासाठी सम्यग्दर्शन- ज्ञान चारित्र या तिघांची एकता हा मोक्षाचा रामबाण उपाय आहे. दर्शन-ज्ञान- चारित्र हे आत्म्याचे अविनाभावी गुण आहेत. 'जशी दृष्टि तसी सृष्टि' या न्यायाने जेथे दृष्टीमध्ये समीचीनता येते तेथे ज्ञान चारित्र इत्यादि सर्व गुणांमध्ये समीचीनता येते. सम्यक्त्व घातक दर्शनमोहाचा अभाव व सम्यक्त्व चारित्र घातक अनंतानुबंधी चारित्रमोहाचा अभाव झाला असताना चवथ्या गुंणस्थानापासून सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र या तीघांची युगपत् प्राप्ती होते म्हणून मोक्षमार्गावा प्रारंभ गुणस्थान चौथ्यापासून होतो. यद्यपि चौथे गुणस्थानात व्रतसंयमरूपचारित्र नसते. म्हणून ते गुणस्थान अविरत - असंयत म्हटले जाते. तथापि तेथे सम्यग्दर्शनाबरोबर सम्वत्वाचरण चारित्र ( स्वरूपाचरण चारित्र) देखील प्राप्त होते. ' चारित्रादेव संवर: ' संवरनिर्जरारूप मोक्षमार्गांचा प्रारंभ चारित्राशिवाय होत नाही. संवर - निर्जरेचा प्रारंभ सम्यग्दर्शनाच्या प्राप्तीपासून होतो. यावरून सम्यग्दर्शन-ज्ञानचारित्ररूप मोक्षमार्गाचा प्रारंभ गुणस्थान चौथ्यापासून होतो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org