SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 46
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ॥ ॐ नमः सिद्धेभ्यः॥ श्रीमद् अमृतचन्द्र आचार्य विरचित तत्त्वार्थसार मंगलाचरण जयत्यशेष तत्त्वार्थप्रकाशि प्रथितश्रियः । मोहध्वान्तौघ निर्भेदि ज्ञानज्योतिजिनैशिनः ॥ १ ॥ अर्थ- ग्रंथ प्रारंभी इष्टदेव स्तवन मंगल म्हणून ज्यांची अनंतज्ञान अनंतदर्शन, अनंतसुख, अनंतवीर्य स्वरूप, अन्तरंग लक्ष्मी व समवसरण आदिरूप बहिरंगलक्ष्मी प्रसिद्ध आहे त्या सर्वज्ञ जिनेश्वर भगवंताची केवलज्ञान ज्योति या जगतावर सदासर्वकाल जयवंत राहो ही मंगलभावना सूचित केली आहे. ती ज्ञानज्योति जीव, अजीव आदि संपूर्ण तत्त्वांचे हेय-उपादेयरूपाने मार्गदर्शन करणारी आहे व जगातील सर्व भव्य जीवांचा मोहांधःकार नाश करणारी आहे. येथे इष्टदेव स्तवन म्हणून सादिसांत विशिष्ठ शक्तिरूप तीर्थंकर देवाचे नामस्मरण न करताना ज्या अनादिनिधन आत्मज्योतिने आत्मा परमात्मा वनतो ती ज्ञानज्योति जगतावर सदैव प्रकाशित राहो ही मंगल भावना सूचित केली आहे. ग्रंथ प्रतिज्ञा अथ तत्त्वार्थसारोऽयं मोक्षमार्गकदीपकः । मुमुक्षूणां हितार्थाय प्रस्पष्टमधिधीयते ॥ २ ॥ अर्थ- या श्लोकामध्ये ग्रंथकार आचार्य अमृतचन्द्रदेव ग्रंथप्रतिज्ञा सूचित करतांना म्हणतात- हा तत्त्वार्थसार नामक ग्रंथ मोक्षमार्गाचा Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy