________________
तत्वार्थसार अधिकार ८ वा
अर्थ - ज्यांनी आपल्या शुद्धात्मस्वरूपाची प्राप्ति करून घेतली अशा पंचपरमेष्ठी परमात्म्यांचे जे श्रद्धान ते व्यवहार सम्यग्दर्शन त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान ते व्यवहार सम्यग्ज्ञान, त्यांच्या स्वरूपाचे ध्यान चितवन-भक्ति ते व्यवहार सम्यक्चारित्र तो व्यवहार मोक्षमार्ग होय.
व्यवहार मोक्षमार्गस्थ मुनि
श्रद्दधानः परद्रव्यं बुध्यमानस्तदेव हि । तदेवोपेक्षमाणश्च व्यवहारी स्मृतो मुनिः ॥ ५ ॥
अर्थ - खरादेव शास्त्र गुरु किंवा पंचपरमेष्ठी यांचे श्रद्धान करणारा त्यांचे स्त्ररूप जाणणारा व त्यांची भक्ति-अनुराग पूर्वक त्यांचे अनुसरण करणारा त्यांनी सांगितलेल्या वीतराग मार्गांचे आचरण करणारा तो व्यवहारमोक्षमार्गस्य मुनि होय. निश्चय मोक्षमार्गाची भावना ठेऊन व्यवहार मोक्षमार्गाची साधना करणारा तो व्यवहार मोक्षमार्गस्थ हो
निश्चय मोक्षमार्गस्थ मुनि
स्वद्रव्यं श्रद्दधानस्तु बुध्यमानस्तदेव हि । तदेवोपेक्षमागश्च निश्चयान्मुनिसत्तमः ।। ६ ।।
५९
अर्थ - जो आपल्या शुद्धपरमात्मतत्त्वाचे श्रद्धान करतो, त्याचीच निरंतर जागीव ठेवतो. व रागद्वेषरहित परमउपेक्षाभाव - वीतरागभाव धारण करतो तो निश्चयमोक्षमार्गस्य मुनि होय. देवदर्शन-शास्त्रस्वाध्यायपूर्वक व्यवहार मोक्षमार्गांची साधना करणाराच आत्मदर्शनरूप निश्चयमोक्षमार्गाची साधना करू शकतो.
निश्चयनयाने अभेदरत्नत्रयस्वरूप आत्माच षट्कारक आहे
आत्मा ज्ञातृतया ज्ञानं सम्यवत्वं चरितं हि सः । स्वस्थो दर्शन चारित्र मोहाभ्यामनुपप्लुतः । ७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org