________________
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
अर्थ- आत्माच ज्ञान दर्शन स्वभाव असल्यामुळे ज्ञातास्वरूप आत्माच स्वभावपरिणतिचा कर्ता आहे. दर्शनमोह व चारित्रमोहरूप मिथ्यात्व व असंयम यानी रहित आत्मस्वरूपस्थित आत्मा व सम्यग्यदर्शन चारित्ररूप आहे
आत्माच रत्नत्रय परिणतिचा कर्ता आहे पश्यति स्वस्वरूपं यो जानाति च चरत्यपि । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव स स्मृतः ।। ८ ॥
अर्थ- स्वस्वरूपाचे श्रद्धान आत्माच करतो, आत्मदर्शन आत्माच करतो. आत्मस्वरूपाला आत्माच जाणतो. स्वस्वरूपामध्ये अनुचरण-लीन होणे आत्माच करतो. याप्रमाणे अभेदनयाने दर्शन-ज्ञान-चारित्र परिणति क्रियेचा कर्ता परनिरपेक्ष स्वतंत्र एक आत्माच आहे. (स्वतंत्र:कर्ता)
अभदनयाने आत्माच परिणति क्रियेचे कर्म आहे पश्यति स्वस्वरूपं यं जानाति च चरत्यपि । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव तन्मयः ॥ ९ ॥
अर्थ- आत्मा ज्या स्वस्वरूपाचे श्रध्दान करतो तो आत्माच आहे. ज्या स्वरूपाला जाणतो तो आत्माच आहे. ज्या स्वरूपाचे अनुचरण करतो तो देखील आत्माच आहे, याप्रमाणे अभेदनयाने दर्शन-ज्ञान-चारित्रु परिणति क्रियेचे आत्माच कर्म आहे. (क्रियाव्याप्यं कर्म)
आत्माच करण (साधन) आहे दृश्यते येन रूपेण ज्ञायते चर्यतेऽपि च । दर्शन-ज्ञान-चरित्रत्रयमात्मैव तन्मयः ॥ १० ॥
अर्थ-आत्मद्वारेच आत्मा श्रध्दान करतो. आत्मद्वारेच आत्मा जाणतो आत्मद्वारेच आत्मा अनुचरण करतो याप्रमाणे रत्नत्रय परिणति क्रियेचे साधकतम करण साधन आत्माच आहे (साधकतमं करणं)
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org