________________
तत्वार्थसार अधिकार ८ वा
१) काल- कालाच्या अपेक्षेने अवसर्पिणी काळात सुषमा दुषमा नामक तृतीय कालाच्या शेवटी उत्पन्न झालेला जीव व दुषमा सुषमा नामक चतुर्थ काळात उत्पन्न झालेला जीव मोक्षास जाऊ शकतो उत्सापिणी काळाच्या अपेक्षेने दुषमानामक पांचव्या काळाच्या शेवटी उत्पन्न झालेला व दुषमा सुषमा नामक चतुर्थ कालात उत्पन्न झालेला जीव मोक्षास जाऊ शकतो. सामान्यपणे मोक्षाचा काळ चतुर्थंकालच असतो. इतर कालान मोक्ष होत नाही.
२) लिंग- लिंग म्हणजे वेद मोक्षाला जाताना वास्तविक जीवाचे परिणाम वेदातीत असतात तथापि भूतपूर्वनयाच्या अपेक्षेने कोणी भावलिंगाच्या अपेक्षेने नपुंसक वेदातून वेदातीत होऊन मोक्षास जातो. कोणी स्त्रीवेदातून वेदातीत होऊन मोक्षास जातो. कोणी पुरुष वेदातून वेदातीत होऊन मोक्षास जातो. परंतु द्रव्यलिंगाच्या अपेक्षेने पुरुष द्रव्यलिंगातूनच वेदातीत होऊन मोक्षास जातो.
अथवा- लिंग म्हणजे बाह्य वेष. मोक्षास जाताना एक निग्रंथ लिग धारीच मोक्षास जातो. सग्रंथ लिंग धारीला श्रावकाला निग्रंथ लिंग धारण केल्याशिवाय मोक्ष होत नाही.
३) गती- गतिच्या अपेक्षेने प्रत्युत्पन्न नयाच्या अपेक्षेने प्रत्येक जीव मिद्धगतीतून सिद्ध होतो. मनुष्यगतीतूनच सिद्ध होतो अन्यगतीतून साक्षात् मोक्ष प्राप्ति होत नाही. भूतपूर्वनय अपेक्षेने कोणी देवगतीतून मनुष्य होवून मोक्षास जातो कोणी नरकगतीतून मनुष्य होऊन मास जातो. कोणी तिर्यंच गतीतून मनुष्यगति धारण करून मोक्षास जातो.
४) क्षेत्र- प्रत्युत्पन्न नय विवक्षेने आपल्या प्रदेश क्षेत्रात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. भूतप्रज्ञापन नयाच्या अपेक्षेने अडीच द्वीपातील पाच भरतक्षेत्र, पाच ऐरावतक्षेत्र, पाच विदेहक्षेत्र या कर्मभमीतूनच मोक्षाची प्राप्ति होते. भोगभूमी क्षेत्रातून जीवास मोक्ष प्राप्ति होत नाही.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org