________________
तत्वार्थसार अधिकार ८ वा
५) तीर्थ- कोणी तीर्थकर होऊन सिद्ध होतात. कोणी तीर्थकर न होता सामान्य केवली होऊन सिद्ध होतात कोणी तीर्थकराच्या काळात सिद्ध होतात. कोणी तीर्थकराच्या मधल्या तीर्थकाळात सिद्ध होतात.
६) ज्ञान- प्रत्युत्पत्र नयविवक्षेने प्रत्येक जीव केवल ज्ञानानेच मोक्षास जातो. भूतपूर्वनय विवक्षेने कोणास मतिश्रुतज्ञानातून केवलज्ञान होऊन मोक्ष होतो. कोणास मति-श्रुत अवधिज्ञानातून केवल ज्ञान होऊन मोक्ष होतो कोणास मति-श्रुत-अवधि-प्रनःपर्यय ज्ञानातून केवलज्ञान होऊन मोक्ष होतो.
७) अवगाहन- मुक्त जीवाचो अवगाहना पूर्वशरीराचा आकार प्रमाण असते. मुक्त जीवाची उत्कृष्ट अवगाहना ५२५ धनुष्य असते. जघन्य अवगाहना सात धनुष्य (३१ हात)प्रमाण असते.
८) बुद्ध बोधित बुद्ध- कोणी जीव अन्य गुरूचा उपदेश न ऐकताच स्त्रयं बुद्ध होऊन मोक्षाय जातात. कोणी अन्य गुरूचा उपदेश एकून बुद्ध (ज्ञानी) होऊन मोक्षास जातात.
९) चारित्र- प्रत्युत्पन्न नयाने प्रत्येक मोक्षास जाणान्या जीवास यथाख्यात चारित्रातूनच मोक्ष होतो. भूतपूर्वनयाने कोणी सामाधिक सूक्ष्मभापराय यथाख्यात चारित्र धारण करून मोक्षाम जातात. कोणी सामायिक छेदोरस्थापना परिहारविशुद्धि, मूक्ष्म सांपराय-यथाख्यात चारित्र धारण करून मोक्ष स जातात.
१०) संख्या- एकावेळी एकच जीव मोक्षास जातो. कधी जास्तीत जास्त एकावेळी १०८ जीव मोक्षास जातात. दर ६ महिने ८ समयात निगोद राशीतून ६०८ जीव संसाराशीत येतात व तितकेच ६०८ जीव मोक्षास जातात.
११) अल्प बहुत्व- १) संख्या- प्रत्युत्पन्ननय विवक्षन एका समयात एक जीव मोक्षास जातो. जास्तीतजास्त १०८ जीव मोक्षाम जातात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org