________________
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
लेप निघून जाताच पाण्याच्या वर येतो त्यामुळे कर्मलेपामुळे संसारसागरात बुडलेला आत्मा कर्मलेप निघून गेल्यामुळे ऊर्ध्वगमन करतो.
ज्या प्रमाणे एरंडाचे बीज वरील टरफल फोडले असताना एकदम वर उसळते त्याप्रमाणे कर्म बंधाचा छेद झाला असताना जीव ऊर्ध्वगमन करतो.
ज्या प्रमाणे मातीचा ढेकूळ स्वभावतः अधोगमन करतो, वायु हा स्वभावत: वर तिर्यक् दिशेने करतो, अग्निशिखा स्वभावत: वर जाते त्याप्रमाणे जीव देखील स्वभावतः ऊर्वगमन करतो. भगवंतानी जीवाचे गमन स्वभावत: ऊर्ध्वगमन सांगितले आहे व पुद्गलाचे गमन स्वभावतः अधोगमन सांगितले आहे संसार अवस्थेत जीव कर्माच्या संयोगवश चारदिशेला व खाली किंवा वर अशा ६ दिशेला आकाश प्रदेशाच्या श्रेणीबद्ध गतीने गमन करतो. तसेच कर्ममुक्त झाल्यानंतर सिद्धजीव स्वभावत: ऊर्ध्वगमन करतो.
कर्मनाश व ऊध्वंगमन एकसमयात होतात. द्रव्यस्य कर्मणो यद्वद् उत्पत्यारंभवीतयः । समं तथैव सिद्धस्य गतिर्मोक्षे भवक्षयात् ।। ३५ ।। उत्पतिश्च विनाशश्च प्रकाशतमसोरिह । युगपद् भवतो यद्वत् तद्वन्निर्वाण कर्मणोः ॥ ३६ ॥
अर्थ- ज्या प्रमाणे संसारी जीवाच्या पूर्ववद्ध द्रव्यकर्माचे उदयास येऊन निघून जाणे व नवीन कर्माचे आत्रवरूपाने येणे हे एकच समयात युगपत् होते, अथवा ज्याप्रमाणे प्रकाशाची उत्पत्ति व अंधःकाराचा नाश हा एकच समयात युगपत् होतो त्याप्रमाणे कर्माचा क्षय व जीवाचे ऊर्ध्वगमन युगपत् एकच समयात होते.
कोणत्या कर्माच्या नाशाने कोणता गुण प्रकट होतो. ज्ञानावरणहानात् ते केवलज्ञान शालिनः । दर्शनावरणच्छेदाद् उद्यत्केवलदर्शनाः ॥ ३७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org