________________
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
४७
ततोऽन्तराय ज्ञानधन दर्शन धन:न्यनन्तरं : प्रहीयन्ते ऽस्ययुगपत् त्रीणि कर्माण्यशेषतः ॥ २२ ॥
गर्भसूच्यां विनष्टायां यथा बालो विनश्यति । तथा कर्म क्षयं याति मोहनीये भयंगते ॥ २३ ॥
ततः क्षीणचतुः कर्मा प्रात्पोऽथाख्यात संयमः । बीतबंधन निर्मुक्तः स्नातकः परमेश्वरः ।। २४ ।।
शेषकर्म फलापेक्षः शुद्धो शध्दो निरामयः । सर्वज्ञः सर्वदर्शीच जिनो भवति केवली ॥ २५ ॥
कृत्स्नकर्मक्षयादूवं निर्वाण मधिगच्छति ।। यथा दग्धेन्धनो वन्हिनिरुपादान संततिः ॥ २६ ॥
। अर्थ- प्रथम हा जीव सम्यग्दर्शन ज्ञान चारित्र संपन्न होऊन नवीन कर्माचा आस्रवनिरोध रुप संवरभाव करतो नंतर पूर्ववध्द कर्माची निर्जरा करून दर्शन मोहाचा क्षय करून क्षपक श्रेणीच्या द्वारे चारित्र मोहाचा पूर्णपणे क्षय करून संसाराचे मुळ बीज मोहनीय कर्म त्याचा पूर्णपणे क्षय करून क्षीण मोह होतो. नंतर ज्ञानावरण दर्शनावरण अंतराय या तीन घाति कर्मांचा युगपत् क्षय करतो. ज्याप्रमाणे जन्मजात मुलाची गर्भनाळ नष्ट झाली तर बालकाचा मृत्यु होतो. त्याप्रमाणे मोहनीय कर्मरूप संसार बीजाचा नाश झाला असताना यथाख्यात संयम धारण करून जीव चार घाति कर्मांचा नाश करून आयुकर्म स्थिति काळ संपेपर्यत बाकीच्या अघाती कर्माचे फळ भोगीत केवळी भगवान शुध्दोपयोगाच्या द्वारे आपल्या शुद्ध आत्मस्वरुपाचे चितवन करीत शेवटी सर्व कर्माचा क्षय करून वर लोकाकाशाच्या अग्रभागी निर्वाण स्थानाला जातो. ज्याप्रमाने दाह्य इंधन पूर्णपणे जळल्यानंतर अग्नि हा नामशेष होतो. त्याप्रमाणे कर्मरुपी इंधनाचा नाश झाल्यानंतर विकल्परुप ध्यानाग्निरुप संततिचा नाश होऊन जीव निर्विकल्प शुद्ध ज्ञानदर्शन स्वरूप परिणमतो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org