________________
तत्वार्थसार अधिकार ८ वा
अर्थ - ज्याप्रमाणे शराव (मातीचे भांडे ) चंद्रशाळा ( घरावरील गच्ची ) इत्यादि अनेक आकाराच्या आधाराने दीपकाचा प्रकाश हा लहान-मोठा होतो. त्याप्रमाणे आत्म्याचे प्रदेश अनात्मा नोकर्म शरीराच्या संयोगात आपल्या संकोच विस्तार शक्तीमुळे, शरीर प्रमाण लहान मोठया आकाराचे होतात. परंतु सिध्द अवस्थेत शरीराचा अभाव असल्यामुळे ते संकोच विस्तार होणेचे कार्य होतनाही. त्यामुळे सिध्द जीवाचे प्रदेश लोकाकाशभर न पसरता पूर्व शरीराच्या आकाराचे राहतात. संकोच विस्तार होणे ही जरी जीवाची शक्ती आहे, तथापि तिचे संकोच विस्तार होण्याचे कार्य हे शरीराच्या संयोगातच होते शरीर संयोगा शिवाय होत नाही. कारण शरीराच्या निमित्त कारणाच्या अभावात ते संकोच विस्तार होणे बंद होते जीवाचे प्रदेश पूर्व शरीराच्या आकाराचेच राहतात.
मुक्त जीवाचा ऊर्ध्वगमन स्वभाव.
कस्यचित् शंखला मोक्षे तत्रावस्थानदर्शनात् । अवस्थानं न मुक्तानामूर्ध्वव्रज्यात्मकत्वतः ॥ १९ ॥
४६
अर्थ - लोक व्यहारामध्ये एखद्याचे शृंखलाबंधन स्टले तरी त्याचे अवस्थान त्याच जागी राहते. परंतु मुक्त जीवाचे कर्मबंधन नाहीसे झाल्यानंतर तो तेथेच न राहता ऊर्ध्वगमन स्वभाव असल्यामुळे एका समयात लोकाकाशाच्या अग्रभागी सिध्द शिलेवर जाऊन विराज मान होतो.
मोक्ष होण्याचा क्रम
सम्यकज्ञान चारित्र संयुतस्यात्मनो भृशं । निरास्रवत्वाच्छिन्नायां नवायां कर्म संतम्तौ ।। २० ।।
पूर्वजितं क्षपयतो यथोक्तैः क्षयहेतुभिः । संसारबीजं कार्त्स्न्येन मोहनीयं प्रहीयते ।। २१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org