________________
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
X3
अर्थ- शंका- येथे कोणी प्रश्न करतो की जमिनीवर भांडे असते जरी भांड्याला जमिनीचा आधार असला तरी भांडे कारण वश खाली पडू शकते त्याप्रमाणे जीव मोक्षस्थानी गेला तरी त्याचे पुनः पतन होऊ शकेल ?
समाधान- ज्याप्रमाणे नौका किंवा जहाज यामध्ये पाणी शिरले तर नियमाने पाण्यात खाली बुडते परंतु जीव कर्मबंधन मुक्त झाल्या नंतर पुनः त्याला नवीन कर्माचा आस्रव होत नसल्यामुळे व तो आपल्या आत्मस्वरूपात अविचल स्थिर होते असल्यामुळे पूनः खाली संसारात कधीही पडत नाही, वर मोक्षस्थानातच आपल्या स्वरूपात निरंतर वास करतो.
पूनः संसार पतनासंबंधी शंका- समाधान
तथापि गौरवाभावान्न पातोस्ऽय प्रसज्यते । वृत्तसम्बन्धविच्छेदे पतत्यानफलं गुरु ।। १२ ।।
अर्थ- शंका शंकाकार पुनः शंका करतो की तथापि जीव मोक्षस्थानातून खाली पडू शकेल ?
समाधान- ज्याप्रमाणे देठाच्या संबंधापासून विच्छेद झाल्यावर जड आम्रफळ झाडावरून खाली पडू शकते परंतु आत्मा कर्मबंधनापासून मुक्त झाल्यामुळे नोकर्म शरीराचा गुरुभार जडपणा नाहीसा झाल्यामुळे मोक्षस्थानापासून कधीही खाली पडत नाही.
मिध्वक्षेत्र लहान असताना अनन्त जीव कसे सामावतात ? शंका-समाधान
अल्प क्षेत्रे तु सिध्दानामनन्तानां प्रसज्यते । परस्परोपरोधोऽपि नावगाहन शाक्तिः ।। १३ ।। नानादीपप्रकाशेषु मुतिमत्स्वपि दृश्यते । न विरोधः प्रदेशेऽल्पे हन्त मूर्तेषु किं पुनः ।। १४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org