________________
तस्वार्थसार अधिकार ८ वा
अर्थ- शंका- शंकाकार शंका करतो की सिध्दशिला मोक्षस्थान फार लहान मनुष्य लोका एवढे अडीच द्वीपप्रमाण ४५ लाखयोजन विस्ताराचे व सिध्द जीव तर अनंतानंत आहेत तेव्हा ते परस्परास उपरोध अडथळा करीत असतील ?
समाधान- आचार्य या शंकेचे समाधान करतात. की सिध्द जीवांच्या शुध्द अमूर्त आत्म प्रदेशामध्ये अवगाहन शक्ती असल्यामुळे ते परस्परास उपरोध करीत नाहीत. त्यासाठी दृष्टांत देतात की अनेक दिव्यांचा प्रकाश मुर्तीमान् पुग्दल द्रव्यपरमाणू असताना एका खोलीत परस्पराम सामावून घेतात. एकमेकास अडथळा करीत नाहीत. मग सिध्द जीवांचे आत्मप्रदेश तर शुब्द व अमूर्त आहेत ते जर परस्परास सामावून घेतील तर त्यात काय आश्चर्य ? अर्थात् ते परस्परास अडथळा न करता एक क्षेत्रावगाह रूपाने परस्परात सामावन राहतात.
सिद्ध जीवना आकार नसतो मग त्यांचा सद्भाव कसा ? शंका-समाधान. आकाराभावतो भावो न च तस्य प्रसज्यते । अनन्तर परित्यक्त शरीराकार धारिणः ।। १५ ।।
अर्थ- शंका- शंकाकार शंका करतो की संस्थान (आकार) हा पुग्द्ल मूर्त द्रव्याचा पर्याय धर्म आहे. अमूर्त द्रव्याला आकार नसतो. संसार अवस्थेत जीव शरीर सहित असतो म्हणून जे शरीर धारण करतो त्या आकाराचा जीव म्हटला जातो. सिद्ध जीवाना शरीर नसते. मग त्याना आकार नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व आहे की नाही हे कसे समजावे ?
___समाधान- आचार्य या शंकेचे समाधान करतात यद्यपि सिद्ध जीवाना नोकर्म शरीर नपते. तथापि जीत्राच्या प्रदेशामध्ये संकोन विस्तार शक्ती असते ती शरीराचा संयोग असताना च कार्य रूप परिण नते व त्यामुळे जीवाचा आकार शरीर प्रमाण लहान मोठा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org