________________
४२
तत्वार्थसार अधिकार ८ वा
व जीव यांचा परस्पर संयोग रुप (संसार परंपरा रूप) कार्य कारण भाव हा अनादिकालापासून सतत चालू आहे. परंतु जीव जेव्हां मिथ्यात्वादि विभाव परिणामाचा त्याग करून आपल्या स्वभाव भावात स्थिर होतो. तेव्हा संसाररूप कार्यकारण भावाचा अत्यंत विच्छेद होऊन जीव आपल्या शुध्दात्मस्वरुपात कायमचा स्थिर होतो. अज्ञान जनावराप्रमाणे तो पुनः कर्मबंधनात पडत नाही तसेव कर्मबंधन नसल्यामुळे अज्ञ जनावराप्रमाणे मोकाट ही भटकत नाही. आपल्या शुध्दात्मस्वभावरूपी घरात नित्य वास करतो. सिध्द जीव जगाला जाणतात पाहतात पण पुनः कर्माने लिप्त होत नाहीत.
जानतः पश्यतश्चोर्ध्वं जगत् कारुण्यतः पुनः । तस्य बंधप्रसंगो न सर्वांसव परिक्षयात् ।। ९ ।।
अर्थ- मोक्षास गेल्यानंतर जीव लोकाकाशाच्या अग्रभागी सिध्द शिलेवर जाऊन विराजमान होतो. तेथून सर्व जगताला करुणाभावाने वीतराग भावाने जाणतात पाहतात तथापि संपूर्ण कर्माच्या आपत्र बंधाचा क्षय झाल्यामुळे पुनः नवीन कर्मबंधाचा प्रसंग येत नाही. संसार अवस्थेत जीवाच्या मिथ्यात्वादि आस्रव भावाशी कर्मबंधा का कार्य कारण भाव होता. आस्व भावाचा पूर्णपणे अभाव झाल्यामुळे कर्मबंधाचा प्रसंग येत नाही कारणाशिवाय कर्मबंध होत नाही.
अकस्माच्च न बन्धः स्यादनिर्मोक्ष प्रसंगतः । बंधोपपत्तिस्त्तत्र स्यात् मुक्तिप्राप्तेरनन्तरं ॥ १० ॥
अर्थ- कोणतेही कार्य कारणाशिवाय होत नाही. कारणाशिवाय जर कर्मबंध मानला तर जीवाला कधीच मोक्ष होणार नाही. मुक्ती प्राप्तीनंतर ही पुनः कर्मबंधाची उपपत्ति संभावना मानण्याचा प्रसंग येईल. मोक्षस्थानापासून जीवाचे पतन होणे संबंधी शंका समाधान
पातोऽपि स्थानवत्त्वान्न तस्य नास्वतत्वतः । आस्वाद यानपासस्य प्रपातोऽधो ध्रुवं भवेत् ।११।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org