________________
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
कसा होणार? कर्माचा अंत न होण्याचा प्रसंग येईल?
समाधान- त्याचे आचार्य उत्तर देतात कर्माचा अंत न होण्याचा प्रसंग येत नाही. अर्थात कर्मबंध संतति अनादि असली तरी त्याचा अत होऊ शकतो ही गोष्ट दृष्टांतावरून सिद्ध करतात. ज्याप्रमाणे बीज व अंकुर यांची संतति परंपरा अनादि आहे. बीजापासून अंकुर अंकुरापासून वीज, याना आदि नाहो तथापि शेवटले बीज जर अग्नीने नष्ट केले. तर पुनः अंकुर उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे शेवटला कर्मबंध जर नवीन कर्मबंधाचा निरोध पूर्वक संवर पूर्वक पूर्णपणे नष्ट झाला तर नवीन कर्मबंध न झाल्यामुळे त्यापासून जन्म मरणरूपी संसाररुपी अंकुर पुन: उत्पन्न होत नाही. जीव कर्माचा नाश करुन मोक्षास गेल्यानंतर पुन: कधीही संसारात येत नाही.
कर्ममुक्त झाल्यानंतर पुन: कर्मबंधन मानला तर कार्य-कारण व्यवस्था राहणार नाही शंका समाधान
अव्यवस्था न बंधस्य गवादीनामिवात्मनः । कार्यकारणविच्छेदात मिथ्यात्वादि परिक्षये ।। ८ ।।
अर्थ- शंका- ज्याप्रमाणे बैल.गाय आदि जनावराना बंधन मुक्त करून पूनः बांधन ठेवले तर ते आपल्या एका ठाण्यावर राहतात. बंधन नसते तर ते इकडे मोकाट फिरतील. तसा आत्मा कर्म बंधनातून मुक्त झाल्यावर जर पुनः कर्मबंध न मानला तर सर्वत्र कार्य-कारण भावाचा विच्छद होईल. कार्य-काराग भाव व्यवस्था राहणार नाही ?
समाधान जो पर्यंत जीव मिथ्यात्वादि विभाव भाव रूपाने परिणमतो तो पर्यंतच जीवाचे रागादिपरिणाम व कर्म बंध यांचा कार्य कारण भाव संबध असतो जीव आपल्या अज्ञान अपराधाने मिथ्यात्वादि परिणाम करतो त्यामुळे कर्म बंध होतो. कर्मबंध झाल्यामुळे कर्म जेव्हां उदयास येते तेव्हा जीव पुनः राग द्वेषादि भाव करतो याप्रमाणे कर्म
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org