________________
४०
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा सातिशय पुण्याची प्राप्ती होते नंतर अयोग केवल गुणस्थानात योगाच्या अभावात नवीन कर्माचा आस्रव होत नाही. पूर्वबद्ध संचित कर्माचा क्षय होतो. शुद्ध आत्मस्वरूपाची प्राप्ती होते (सिद्धिः स्वात्मोपलब्धिः) शुद्ध आत्मस्वरूपाची प्राप्ती यालाच अध्यात्मनय भाषेत मोक्ष म्हणतात. व्यवहारनय भाषेत आठ कर्मांच्या अभावाने मोक्ष होतो असे म्हटले जाते. जीव आपल्या शुद्धोपयोग सामर्थ्याने आपल्या शुद्ध आत्मस्वरूपात राहण्याचा पुरुषार्थ करतो त्यावेळी सर्व कर्माचा अभाव हा स्वयं होतो.
मोक्षामध्ये कशाचा अभाव होतो तथौपशामिकादीनां भव्यत्वस्यच संक्षयात् ।
मोक्षः सिद्धत्वसम्यक्त्व ज्ञानदर्शनशालिनः ।। ५ ।। V अर्थ-- तसेच कर्माच्या सद्भावात-विभावात होणारे जे संयोगज व वियोगज भाव औपशमिक क्षायोपशाणिक-औदयिक भाव व परिणामिक भावापैकी भव्यत्व भाव यांचा ही नाश होतो. केवळ जीवत्व परिणामिकभाव शिल्लक राहतो. व क्षायिकभाव की जे स्वाभाविकभाव असतात. सिद्धत्व-सम्यक्त्व-ज्ञान-दर्शन क्षायिकदान लाभ-भोग-उपभोग वीर्य आदि स्वभाव शिल्लक राहतात. तसेच अस्तित्व वस्तुत्वादि सामान्यभाव शिल्लक राहतात. क्षायिकभाव हे स्वाभाविकभाव असतात. परंतु त्यांचा स्वाभाविकपणा कायम राहतो. कर्माच्या अभावात त्याला जी क्षायिक संज्ञा दिली गेली होती ती विवक्षा राहत नाही.
अनादि कर्मबंधाचा अंत कसा शंका-समाधान आद्यभावान्न भावस्य कर्मबंधन संततेः । अंताभावः प्रसज्येत दृष्टत्वादन्त्य बीजवत् ।। ६ ।। दग्धे बीजे यथाऽत्यन्तं प्रादुर्भवति नाडकुरः ।
कर्मबीजे तथा दग्धे न रोहति भवाङकुरः ।। ७ ।।
अर्थ- शंका- येथे शंकाकार शंका करतो. की कर्मबंध संतति रूपाने जर अनादि आहे तर ज्या पदार्थाचा आदि नाही त्याचा अंत
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org