________________
तत्त्वार्थसार अधिकार ५ वा
३७
६ तीर्थ- तीर्थंकरांच्या मधल्या तीर्थकाळात सर्व प्रकारचे मुनी होऊ शकतात.
७ स्थान- कषायाच्या तरतमतेमुळे प्राप्त होणारी संयम लब्धि. स्थाने याला स्थान म्हणतात पुलाक-बकुश मुनीना सर्व जघन्य लब्धि स्याने असतात. नंतरअसंख्यात लब्धिस्थाने गेल्यानंतर पुलाक मुनी गळतो पुलाक मुनीना पुढील स्थाने होत नाही. एकटा बकुशमुनी असंख्यात लब्धिस्थानापर्यंत जातो. पुढे बकुश कुशील मुनी काही स्थाने बरोबर चढतात. नंतर बकुश मुनी गळतो त्या पुढील स्थाने होत नाहीत. काही स्यानानंतर प्रतिसेवना कुशील गळतो नंतर शेवटी कषायकुशील गळतो. याप्रमाणे कषायाच्या तरतमतेने संयमस्थाने बदलतात. पुढे निर्ग्रन्थ व स्नातक हे कषाय रहित असतात. त्याना अकषायस्थाने असतात.
पुढे काही स्थाने गेल्यानंतर निर्ग्रन्य गळतो शेवटी स्नातकच एक सयमलब्धिस्थान प्राप्त करून निर्वाण पदाला जातात.
८ उपपाद- उपपाद म्हणजे जन्म उत्कृष्टपणे पुलाक मुनी सहस्रार नामक १२ व्या स्वर्गापर्यत उत्पन्न होऊ शकतात. बकुशमूनि व प्रतिसेवना कुशील आरण अच्युत नामक १६ व्या स्वर्गापर्यत उत्पन्न होतात. कषायकूशील व निर्ग्रन्थ (उपशांतकषाय) गुणस्थानवर्ती सर्वार्थसिद्धी मध्ये उत्पन्न होतात. या सर्वमुनींचा उपपाद जन्म जघन्यपणे सौधर्मस्वर्गात उत्पन्न होतात. निग्रंथ (क्षीणमोह) व स्नातक नियमाने निर्वाणपदाला जातात
निर्जरातत्त्व उपसंहार
इति यो निर्जरातत्त्वं श्रध्दत्ते वेत्त्युपेक्षते । शेषतत्त्वैः समं षड्भिः स हि निर्वाणभाग भवेत् ॥६०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org