________________
तत्त्वार्थसार अधिकार ७ वा
८ त्यानंतर क्षपक श्रेणी चढण्यारा गुण ७-८-९-१० गुणस्थानवर्ती क्षपक निर्जरेचे आठवे स्थान होय.
९ त्यानंतर क्षीणमोह नामक १२ व्या गुणस्थानवी जीव निर्जरेचे नववे स्थान होय.
१० त्यानंतर घातिकर्माचा नाश करणारे १३-१४ गुणस्थानवर्ती सयोगी-अयोगी जिन भगवान हे निर्जरेचे दहावे स्थान होय.
या क्रमाने या दहास्थानामध्ये गुणाकार श्रेणीरूपाने असंख्यात पट निर्जरा उत्तरोत्तर वाढत जाते. जीवाचा अशुभोपयोग हा पापकर्माच्या आस्रवबंधाला कारण असतो. जीवाचा शुभोपयोग हा पुण्यकर्माच्या आस्रव बंधाला कारण असतो. जीवाचा शुद्धोपयोग हा एकटाच संवर-निर्जरारूप मोक्षाचा कारण आहे. म्हणून जेथून संवर पूर्वक निर्जरा सुरू होते तेथून शुद्धोपयोगाचा प्रारंभ तारतम्यरूपाने सुरू होतो. (शुद्धोपयोगादेव संवर:)
तसेच प्रवचनसार ग्रंथात (चारित्रादेव संवरः) म्हटले आहे. यावरून जथून संवरपूर्वक निर्जरेचा प्रारंभ होतो. तेथून मोक्षमार्गा वा प्रारंभ होत असल्यामुळे व मोक्षमार्ग हा सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र यांची एकता स्वरूप असल्यामुळे गुणस्थान चवथ्यापासून अनंतानुबंधीच्याअभावात सम्यक्त्व सहित सम्यक्त्व चरण चारित्र अथवा स्वरूपाचरण चारित्र याचाही प्रारंभ होतो. स्वरूपाचरण चारित्रसहित देशचारित्र व सकल चारित्र धारण करणान्याचे गुणस्थान पाचवे व सहावे-सातवे मानले जाते. स्वरूपाचरण चारित्राशिवाय बाह्य देशवत किंवा सकल संयमव्रत धारण करणा-या द्रव्यलिंगीचे गणस्थान आगमात कारणानयोग शास्त्रात प्रथम गुणस्थान सांगितले आहे. यावरून संवर-निर्जरारूप मोक्षमार्गाचा प्रारंभ करणारा चतुर्थगुणस्थानवर्ती सम्यग्दृष्टी ज्ञानीच नियमाने स्वरूपाचरण चारित्र संपन्न व शुद्धोयोग संपन्नच अवश्य मानला पाहिजे. त्याशिवाय तो संवर-निर्जरारूप मोक्षमार्गाचा प्रारंभ कसिद्ध होऊ शकत नाही.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org