________________
३२
तत्वार्थसार अधिकार ७ वा
३ सूक्ष्मक्रिया अप्रतिपाति शुक्लध्यान
अवितर्कमवीचारं सूक्ष्मकायावलंबनं । सूक्ष्मक्रियं भवेद्ध्यानं सर्वभावगतं हि तत् ॥ ५१ ॥ काययोगेऽति सूक्ष्मे तद् वर्तमानो हि केवली । शुक्लं ध्यायति संरोद्धं काययोगं तथाविधं ॥ ५२ ॥
अर्थ - जेव्हा सयोग केवली अरिहंत भगवान विहार बंद करून सूक्ष्म योग धारण करतात तेव्हा त्याना हे सूक्ष्मक्रिया - अप्रतिपाति शुक्लध्यान होते. येथे केवलज्ञान असल्यामुळे श्रुतरूप विकल्प -वितर्क नसतो. व योगाचे संक्रमण देखील नसते म्हणून हे ध्यान अवितर्क अविचार ध्यान असते. केवलज्ञानामध्ये लोक अलोकातील सर्व पदार्थ स्वयं प्रतिबिंबित होतात म्हणून हे ध्यान सर्वगत म्हटले जाते. येथे विहार बंद झाल्यामुळे स्थूल काययोगाचा निरोध होतो. सूक्ष्म काययोग श्वासोच्छ्वासाची धुगधुगी राहते. म्हणून या ध्यानास सूक्ष्मक्रिया अप्रतिपाति शुक्लध्यान म्हणतात.
४ व्युपरतक्रिया निर्वात शुक्लध्यान
हे ध्यान
अवितर्कमवीचारं ध्यानं व्युपरतक्रियं । परं निरूद्धयोगं हि तत् शैलेश्यमपश्चिमं ॥ ५३ ॥ तत्पुनः रूद्धयोगः सन् कुर्वन् कायत्रयासनं । सर्वज्ञः परमं शुक्लं ध्यायत्यप्रतिपत्ति तत् ॥ ५४ ॥ अर्थ - या ध्यानामध्ये वितर्क- वीचार नसतो. म्हणून अवितर्क अवीचाररूप असते. येथे सूक्ष्मकाय योगरूप प्रदेश परिस्पंद बंद होऊन श्वासोच्छवास प्राणाचाही अभाव असतो. केवळ येथे एक आयुप्राण असतो. अशा अयोग केवलीनामक १४ व्या गुणस्थानात हे सर्व क्रियेपासून निवृत्त व्युपरत क्रिया निर्वात नामक शुक्लध्यान होते. येथे अठराहजार शीलाचे परिपूर्ण पालन होते. चारित्राची उत्कृष्ट परिपूर्णता प्राप्त होते. हे गुणस्थान संसाराचा अंत शेवट असल्यामुळे संसाराची अंतिम अवस्थारूप हे ध्यान अपश्चिम म्हटले जाते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org