SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 322
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार ७ वा अर्थ- श्रुत ज्ञानाला वितर्क म्हणतात. अकरा अंगे व चौदा पूर्व यांचा पाठी निरनिराळया नय-प्रमाण- निक्षेप तर्क ज्ञानाच्या द्वारे चितवन करतो. म्हणून यास सवितर्कध्यान म्हणतात. एका बीजाक्षरावरून दुस-या बीजाक्षराचे चितवन, एका योगावरून दुस-या योगद्वारे चितवन याप्रमाणे या ध्यानात विचाराचे संक्रमण होते म्हणून हे शुक्लध्यान सवी चार ध्यान म्हटले जाते. एकत्वशुक्लध्यान द्रव्यमेकं तथैकेन योगेनान्यतरेण च । ध्यायति क्षीणमोहो यत् तदेकत्वमिदं भवेत् ।। ४८ ॥ अर्थ- क्षीणमोह गणस्थान वर्ती जीव जेव्हा मन-वचन काययोग यापैकी कोणत्याही एका योगाने एक द्रव्याचेच चितवन करतो ते एकत्ववितर्क शुक्लध्यान होय. एकत्ववितर्क ध्यानाची विशेषता श्रुतं यतो वितर्कः स्याद् यतः पूर्वार्थशिक्षितः । एकत्वं ध्यायति ध्यानं सवितर्कं ततो हि तत् ॥ ४९ ॥ अर्थव्यंजन योगानां बीचारः संक्रमो मतः। वीचारस्य यसद्भावादवीचारमिदं भवेत् ॥ ५० ॥ अर्थ- श्रुतज्ञान रूप विकल्पाला वितर्क म्हगतात. या ध्यानामध्ये अकरा अंगे व चौदापूर्व श्रुताच्या अर्थाचे पठन करणारा जो श्रुतसंबंधी एका पदार्थाचे चितवन करतो म्हणून या ध्यानास सवितर्क ध्यान म्हणतात. परंतु या ध्यानामध्ये अर्थ संक्रान्ति, व्यंजन संक्रान्ति किंवा योग संक्रान्ति रूप वीचार-परिवर्तन नसते म्हणून हे ध्यान दुसरे शुक्ल अवीचार ध्यान म्हटले जाते. मोह-जिज्ञासेच्या अभावात येथे उपयोगाचे संक्रमण नसते, स्थिरता असते, म्हणून या ध्यानास एकत्ववितर्क अविचार शुक्लध्यान म्हणत त. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy