________________
३०
तत्वार्थसार अधिकार ७ वा
४ संस्थानविचय धर्मध्यान
लोक संस्थान - पर्याय स्वभावस्य विचारणं । लोकानुयोगमार्गेण संस्थानविचयो भवेत् ।। ४३ ।।
अर्थ - ऊर्ध्वलोक मध्यलोक अधोलोकाचा आकार क्षेत्ररचना त्याठिकाणी उत्पन्न होणारे जीवाचे चतुर्गतिरूप पर्याय त्यामध्ये जीवाला होणारे दुःख याविषयी लोकानुयोग शास्त्रद्वारे विचार करणे ते संस्थानविवय धर्मध्यान होय.
शुक्लध्यानाचे ४ भेद
शुक्लं पृथकत्वमाद्यं स्यादेकत्वं तु द्वितीयकं । सूक्ष्मक्रियं तृतीयं तु तुर्यं व्युपरतक्रियं ।। ४४ ।
अर्थ- शुक्लध्यानाचे ४ भेद आहेत. १ पृथक्त्ववितर्क वीचार २ एकत्रवितर्क, ३ सूक्ष्मक्रिया अप्रतिपाति, ४ व्युपरत क्रियानिवर्ति.
पृथक्त्ववितर्क शुक्लध्यान
द्रव्याण्यनेक भेदानि योगैर्ध्यायति यत् त्रिभिः ।
शान्तमोहस्ततो ह्येतत् पृथक्त्वमिति कीर्तितं ॥ ४५ ॥
अर्थ - जीव- अजीव आदि अनेक द्रव्य-गुण-पर्याय संबंधी मन
वचन - काय योगाच्या द्वारे ज्याचा दर्शनमोह व चारित्र मोह शांत झाला आहे असा उपशमक क्षपक व उशांतमोह गुणस्यावर्ती जे चितवन करतो त्यास पृथक्त्ववितर्क शुक्लध्यान म्हणतात.
-
पृथवत्वध्यानाची विशेषता
श्रुतं यतो वितर्कः स्याद् यतः पूर्वार्थशिक्षितः ।
पृथक्त्वं ध्यायति ध्यानं सवितर्क ततो हि तत् ॥ ४६ ॥
अर्थ व्यंजन योगानां विचारः संक्रमो मतः । वीचारस्य च सद्भावात् सवीचारमिदं भवेत् ॥ ४७ |;
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org