SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 320
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार ७ वा धर्मव्यानाचे लक्षण व भेद आज्ञापायविपाकानां विवेकाय च संस्थितेः । मनसः प्रणिध्यानं यद् धर्मध्यानं तदुच्यते ।। ३९ ॥ अर्थ- रत्नत्रयधर्म स्वरूप आत्मस्वरूपाचे चितवन ते धर्मध्यान होय. याचे ४ भेद आहेत. १ आज्ञाविचय, २ अपायत्रिचय, ३ विपाकविचय, ४ संस्थानविचय. १ आज्ञाविचय धर्मध्यान प्रमाणीकृत्य सार्वज्ञाभाणंज्ञामय विधारं । गहनानां पदार्थानामाज्ञाविचयमुच्यते ॥ ४० ॥ कथंमार्ग प्रपद्येरन्नमी उन्मार्गतो जनाः । अपायमिति या चिन्ता तदपायविचारणं ॥ ४१ ॥ अर्थ- सर्वज्ञ भगवंताची वाणी ही अन्यथा होऊ शकत नाही म्हणून आगमवचन आज्ञा प्रमाण मानून गहन सूक्ष्म-कालांतरितक्षेत्रांतरित पदार्थावर श्रद्धा ठेवून त्यांचे स्वरूपाविषयी चितवन करणे यास आज्ञाविचय धर्मध्यान म्हणतात. २ अपायविचय धर्मध्यान २९ - अर्थ- हे संसारातील भव्य प्राणी उन्मार्गापासून संसारमार्गापासून परावृत्त होऊन मोक्षमार्गामध्ये कसे प्रवृत्त होतील असे चितवन करणे यास अपायत्रिय धर्मध्यान म्हणतात. ३ विपाकविचय धर्मध्यान द्रव्यादिप्रत्ययं कर्मफलानुभवनं प्रति । भवति प्राणिधानां यद् विपाकविचयस्तु सः ॥ ४२ ॥ Jain Education International अर्थ- जीव जे शुभ-अशुभ परिणाम करतो. त्यामुळे जो पुण्य पाप कर्माचा बंध होतो त्याचे फल स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल स्वभाव या स्वचतुष्टयास अनुसरून मिळते असे कर्मफलाचे चितवन करणे यास विपाकविचय धर्मध्यान म्हणतात. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy