SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 319
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सस्वार्थसार अधिकार ७ वा १ आर्तध्यान लक्षण व भेद प्रियम्शेभ्रऽप्रियप्राप्ते निदाने वेदनो दये। आतं कषायसंयुक्तं ध्यानमुक्तं समासतः ।। ३६ ॥ अर्थ- आर्त म्हणजे दुःखरूप चिंतन. आर्तध्यानाचे ४ भेद आहेत. १) इष्टवियोगज- स्त्री-पुत्र आदि इष्ट वस्तूचा वियोग झाला असता जे दुःख चितवन. २) अनिष्ट संयोगज- रोग- उपसर्ग- शत्रू यांचा संयोग झाला असताना जे दुःख चितवन. ३) निदान- पुढे स्वर्ग सुख वैभव- प्राप्त व्हावे अशी अभिलाषा करणे. ४) वेदनाजन्य- शरीरात रोग उत्पन्न झाला असताना. उपसर्ग प्राप्त झाला असताना दुःखाचे वेदन होणे. २ रौद्रध्यान लक्षण व भेद हिंसायामनृते स्तेये तथा विषयरक्षणे । रौद्रं कषायसंयुक्तं ध्यानमुक्तं समासतः ।। ३७ ।। अर्थ- हिंसेमध्ये, असत्य भाषणामध्ये चोरी करण्याविषयी परिग्रहाचे संरक्षण होण्याविषयी राग-द्वष मोहपूर्वक कषाययुक्त चितवन त्याला संक्षेपाने रौद्रध्यान म्हणतात. याचे ४ भेद आहेत. १ हिंसानंद, २ अनृतानंद, ३ स्तेयानंद, ४ परिग्रहानंद. ध्यानाचे लक्षण एकाग्रत्वेऽतिचिताया निरोधो ध्यानमिष्यते । अन्तर्मुहूर्ततस्तच्च भवत्युत्तमसंहतेः ॥ ३८ ।। अर्थ- मन-वचन- कायरूप योग प्रवृत्तीला रोकून उपयोग एकाग्र-स्थिर करणे याला ध्यान म्हणतात. हे ध्यान उत्तम संहननधारी पुरुषाला जास्तीत जास्त अंतर्मुहूर्त पर्यंत होऊ शकते. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy