________________
२६
तत्त्वार्थसार अधिकार ७ वा
अर्थ- महिना-दोन महिने चारमहिने इत्यादि काही कालमर्यादा भरून आपल्या संघातून काढून टाकणे यास परिहार प्रायश्चित्त म्हणतात. कांही महिने कांही दिवसाची दीक्षा काल कमी करणे यास छेद प्रायश्चित्त म्हणतात.
वैयावृत्य तप सूर्युपाध्याय साधूनां शैक्ष्यग्लान तपस्विनां ।
कुलसंघ मनोज्ञानां वैयावृत्त्यं गणस्य च ॥ २७ ॥ व्याध्याद्युपनिपातेऽपि तेषां सम्यग् विधीयते । स्वशक्त्या स्यात् प्रतीकारो वैयावृत्त्यं तदुच्यते ॥ २८ ॥
अर्थ- आचार्य - उपाध्याय साधू, अध्ययन करणारे शैक्ष्य साधू रोगाने पीडित ग्लान साधू, तपस्वी, दीक्षाचार्यकुल, मुनिसंघ, लोकप्रिय मनोज्ञ साधू आचार्य परंपरा प्रसिद्धगण अशा दहा प्रकारच्या साधूचे वैयावृत्य करणे, त्यांचेवर रोग उपसर्ग वगैरे आला त्यांची यथायोग्य सेवा शुश्रूषा करणे त्यांचा उपसर्ग दूर करणे हे वैयावृत्य तप होय.
व्युत्सर्ग तप
बाद्यांत रोपधि त्यागाद् व्युत्सर्गो द्विविधो भवेत् । क्षेत्रादिरुपधिर्बाह्यः क्रोधादिरपरः पुनः ।। २९ ।।
अर्थ - बाह्य उपाधि - क्षेत्र संयम उपकरण पिंछी वगैरे, शुद्धिउपकरण कमंडलु ज्ञान उपकरण शास्त्र यावरील ममत्व त्याग व अभ्यंतर उपाधि राग-द्वेष वगैरे त्यांचा त्याग याला व्युत्सर्ग तप म्हणतात. विनय तप
दर्शन-ज्ञान- विनयौ चारित्रविनयोऽपि च ।
तथोपचार विनय विनयः स्याच्चतुविधः ॥ ३० ॥
अर्थ - विनयतपाचे ४ भेद आहेत. १) दर्शनविनय, २) ज्ञानविनय, ३) चारित्रविनय, ४) उपचार विनय.
१ दर्शन विनय
यत्र निःशंकितत्वादि लक्षणोपेतता भवेत् ।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org