________________
तत्त्वार्थसार अधिकार ७ वा
२५ १ आलोचनालक्षण आलोचनं प्रमादस्य गुरवे विनिवेदनं ।। २२ ॥ अर्थ- व्रतामध्ये लागलेल्या दोषाचे गुरुजवळ निवेदन करणे यास आलोचन। प्रायश्चित तप म्हणतात.
२ प्रतिक्रमण ३ तदुभय अभिव्यक्त प्रतिकारं मिथ्या मे दुष्कृतादिभिः । प्रतिकान्ति स्तदुभयं संसर्गे सति शोधनात् ॥ २३ ॥
अर्थ- व्रतामध्ये लागलेले दोष व्यक्त करूब 'मिच्छा मे दुक्कडं' माझे दोष मिथ्या होवो. मी पुनः दोष होऊ देणार नाही. याप्रमाणे दोषाचे प्रतिक्रमण करणे व प्रतिक्रमणसहित इतर मुनीच्या संसर्गात आलोचना करणे यास तदुभय प्रायश्चित म्हणतात.
४ तप, ५ व्युत्सर्ग प्रायश्चित्त भवेत् तपोऽवमौदर्य वृत्तिसंख्यादि लक्षणं ।
कायोत्सर्गादि-करणं व्युत्सर्गः परिभाषितः ।। २४ ॥
अर्थ- अवमौदर्य-वृत्तिपरिसंख्यान वगैरे तपधारण करणे. ते नप प्रायश्चित्त होय. कायोत्सर्गव्यान करणे याला व्युत्सर्ग प्रायश्चित्त तप म्हणतात.
६ विवेक ७ उपस्थापना अन्नपानौषधीनां तु विवेकः स्याद् विवेचनं। पुनःक्षाप्रदानं यत् सा हयुपस्थापना भवेत् ॥ २५ ॥
अर्थ- अन्न-दूध-पाणी-औषध इत्यादिक भोज्य पदार्थाचा काही कालाची मर्यादा करून त्याग देणे यास विवेकप्रायश्चित्त म्हणतात. पूर्वदीक्षेचा छेद करून पुनः दोक्षा देणे यास उपस्थापना प्रायश्चित्त म्हणतात.
८ परिहार ९ छेद परिहारस्तु मासादिविभागेन विवर्जनं । प्रवज्याहापनं छेदो मासपक्षदिनादिना ॥ २६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org