SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 315
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार ७ वा २ पृच्छना स्वाध्याय तत्संशयापनोदाय तन्निश्चय बलाय च । परं प्रत्युनुयोगो यः प्रच्छनां तां विदुजिनाः ॥ १८ ॥ अर्थ - परमागम शास्त्रांतील गूढ अर्थाबद्दल संशय - शंका उत्पन्न झाली असताना ती दूर होण्यासाठी जीवादि तत्त्वाचे यथार्थ दृढ श्रद्धान होण्यासाठी विशेष ज्ञानीगुरूजवळ जिज्ञासा पूर्वक प्रश्न विचारणे याला पृच्छना स्वाध्याय जिनेंद्र भगवंतानी म्हटला आहे. ३ आग्नाय ४ धर्मोपदेश स्वाध्याय २४ आम्नायः कथ्यते घोषो विशुद्धं परिवर्तनं । कथाधर्माद्यनुष्ठानं विज्ञेया धर्म देशना ।। १९ ॥ अर्थ- शास्त्रसूत्र ग्रंथाचे निर्दोष शुद्ध उच्चारण करणे याला आम्नाय स्वाध्याय म्हणतात. पुराण कथा श्रावक - मुनिधर्माचे व्रताचे अनुष्ठान आचरण याचा उपदेश देणे याला धर्मोपदेश स्वाध्याय म्हणतात. ५ अनुप्रेक्षा स्वाध्याय साधोरधिगतार्थस्य योऽभ्यासो मनसाभवेत् । अनुप्रेक्षेति निर्दिष्टः स्वाध्यायः स जिनेशिभिः ॥ २० ॥ अर्थ- वाचलेल्या पठन केलेल्या शास्त्रसूत्राचा मनाने पुनः पुनः स्मरण - चितनभावना करणे यात जिनेंद्र भगवंतानी अनुप्रेक्षा स्वाध्याय म्हटले आहे. प्रायश्चित तपाचे भेद आलोचनं प्रतिक्रान्तिस्तथा तदुभयं तपः । व्युत्सर्गश्च विवेकश्च तथोपस्थापना मता ॥ २१ ॥ परिहारस्तथा च्छेदः प्रायाश्चित्तभिदा नव || अर्थ- प्रायश्चित तपाचे ९ भेद आहेत. १ आलोचना, २ प्रतिक्रमण, ३ तदुभय (आलोचनापूर्वक प्रतिक्रमण ), ४ तप, ५ व्युत्सर्ग, ६ विवेक, ७ उपस्थापना, ८ परिहार, ९ छेद. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy