________________
तत्त्वार्थसारआधिकार ७ वा
अर्थ- पद्मासन, कुक्कुटासन आदि अनेक आसन घालून ध्यान करणे, मौनव्रत धारण करणे, हिवाळयात नदीच्या काठी ध्यान करून शीत परीषह सहन करणे, उन्हाळ्यात पर्वताच्या शिखरावर शिलेवर बसून ध्यान करणे याप्रमाणे शरीरावरील ममत्व कमी करण्यासाठी शरीरक्लेश सहन करणे यास कायक्लेश तप म्हणतात.
६ विविक्तशय्यासन तप जंतुपीडाविमुक्तायां वसतौ शयनासनं । सेवमानस्य विज्ञेयं विविक्तशयनासनं ॥ १४ ॥
अर्थ- जेथे मुंग्या-डांस वगैरे जंतु पीडा बाधा होत नाही अशा एकांत स्थानी शयन ( झोप घेणे ) आसन बसणे-उठणे करणे याला विविक्त शय्यासन तप म्हणतात.
___ अभ्यंतर तपाचे भेद स्वाध्यायः शोधनं चैव वैयावृत्यं तथैवच ।
व्युत्सर्गो विनयश्चैव ध्यानमाभ्यन्तरं तपः ।। १५ ।। अर्थ- अभ्यंतर तपाचे ६ भेद आहेत. १ स्वाध्याय, २ प्रायश्चित, ३ वैयावृत्य, ४ व्युत्सर्ग, ५ विनय, ६ ध्यान.
स्वाध्याय तपाचे भेद वाचना प्रच्छनाऽऽम्नायस्तथा धर्मस्य देशना ।
अनुप्रेक्षा च निर्दिष्टः स्वाध्यायः पंचधा जिनैः ।। १६ ॥
अर्थ- स्वाध्याय तपाचे ५ भेद आहेत. १ वाचना, २ पच्छना ३ आम्नाय, ४ धमपिदेश, ५ अनुप्रक्षा.
१ वाचना स्वाध्याय लक्षण वाचना सा परिज्ञेया यत्पात्रेप्रतिपादनं । गद्यस्य वाऽथ पद्यस्य तत्त्वार्थस्योभयस्थ वा ॥ १७ ।। अर्थ- गद्य-पद्य ग्रंथांचे, त्यातील कथन केलेल्या जीव-अजीव आदि तत्त्वाचे त्यांच्या स्वरूपाचे योग्य पात्र शिष्याला प्रतिपादन करणे याला वाचना स्वाध्याय म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org