SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 312
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार ७ वा २१ संवरपूर्वक होणारी निर्जरा मोक्षास परंपरेने कारण होते. ही निर्जरा सम्यग्दृष्टी-रत्नत्रयसंपन्न ज्ञानी तपस्वी लोकानाच होते. तपाचे भेद वर्णन तपस्तु द्विविधं प्रोक्तं बाह्याभ्यंतरभेदतः । प्रत्येकं षड्विधं तच्च सर्व द्वादशधाभवेत् ॥ ७ ॥ अर्थ- तपाचे २ भेद आहेत. १ बाह्य तप, २ अभ्यंतरतप. प्रत्येकाचे ६ भेद आहेत. याप्रमाणे एकूण तप १२ प्रकारचे आहे. १ बाह्यतपाचेभेद बाह्यं तत्रावमौदर्यमुपवासो रसोज्झनं । वृत्तिसंख्या वपुःक्लेशो विविक्तशयनासनं ॥ ८॥ अर्थ-- बाह्य तपाचे ६ भेद आहेत. १ अब मौदर्य, २ अनशन, ३ रसपरित्याग, ४ वृत्तिपरिसंख्यान, ५ कायक्लेश, ६ विविक्तशय्यासन, १ अवमौदर्यतप सर्वं तदवमौदर्यमाहारं यत्र हापयेत् । एक-द्वि-त्र्यादिभिर्मासै रामासं समयान्मुनिः ।। ९ ॥ अर्थ- जेव्हा मुनि काही कालाची मर्यादा नियम करून एकघास दोन-घास तीन-घास याप्रमाणे आहारातुन कमी करीत करीत एक घासच आहार घेतो. पुढे क्रमाने एक घास दोन घास तीन घास असा आहार वाढवीत जातो त्याला अवमौदर्य तप म्हणतात. यालाच कवलचंद्रायणवत म्हणतात. २ अनशनतप मोक्षार्थं त्यज्यते यस्मिन्नाहारोऽपि चतुर्विधः । उपवासः स तद्भेदाः सन्ति षष्ठाष्टमादयः ।। १० ।। अर्थ- आहारामुळे प्रमाद उत्पन्न होतो. प्रमादामुळे आत्मस्वरूपात उपयोग स्थिर राहात नाही. त्यामुळे आत्मस्वरूपात स्थिरतारूप मोक्षाची Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy