________________
तत्त्वार्थसार अधिकार ७ वा
आले नाही. त्याच्या स्थितीचे अपकर्षण करून उदीरणारुपाने त्याला उदयावलीत आणून अनुदीर्णरूपाने खिरते. आपले फल न देता तसेच निमूट पणे निघून जाते त्यास अविपाक निर्जरा म्हणतात. याला अनुदय-उदयक्षय किंवा उदयाभावी क्षय अशी नावे आहेत. निघून जाताना कर्म आपले फळ देण्याचे काम करते पण त्या फळाशी जीव समरस होत नाही किंवा उदय क्षय झाल्यामूळे तो उदय मुखाने जात नाही. त्यालाच अनुदय, खिरणे, क्षय होणे हाच ज्याचा उदय म्हटला जातो. त्यास उदयाभावी क्षय असे म्हणतात.
अविपाक निर्जरा दृष्टांत यथाम्रपनसादीनि परिपाकमुपायतः ।
अकालेऽपि प्रपद्यन्ते तथा कर्माणि देहिनां ॥ ५ ॥
अर्थ- ज्याप्रमाणे कच्चा आंबा किंवा फणस आदि फळे याना अकाली गवत आदि गरमीच्या उपायाने पिकविले जाते त्याप्रमाण उदयास न येणारे कर्म स्थिति संपण्याचे अगोदर त्याची उदीरणा होऊन ते अनुदीर्ण रूपाने फळ न देताच तसेच खिरते. क्षय पावते त्यास अविपाक निर्जरा म्हणतात.
कोणती निर्जरा कोणास होते अनुभूय क्रमात् कर्म विपाक प्राप्त मुज्झतां ।
प्रथमाऽस्त्येव सर्वेषां द्वितीया तु तपस्विनां ॥ ६ ॥ अर्थ- पहिली सविपाक निर्जरा ही सामान्यपणे सर्व प्राणीमात्राना होते. जेव्हा कर्म उदयास येऊन आपले फळ देते तेव्हा त्या कर्माच्या सुख-दुःखरूप फळाशी जीव समरस होऊन सुख-दुःखाचे अनुभवन करतो ती सविपाक निर्जरा होय. ही निर्जरा नवीन कर्माच्या आस्वाला कारण असते. दुसरो अविपाक निर्जरा ही सम्यग्दृष्टी-ज्ञानी-तपस्वी लोकाना होते. जेव्हा सम्यग्दृष्टी-ज्ञानी-तपस्वी उदीरणारूपाने उदयास येणा-या कर्माच्या सुख-दुख फलाशी समरस होत नाही तेव्हा त्यामुळे त्याला नवीन कर्माचा आस्रव होत नाही. ही आस्त्रवनिरोध लक्षण
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org