SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 310
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ अधिकार ७ वा ७ निर्जराधिकार मंगलाचरण अनन्तकेवल ज्योतिः प्रकाशित जगत् त्रयान् । प्रणिपत्य जिनान् मूर्ना निर्जरा तत्त्वमुच्यते ॥१॥ अर्थ- ज्यानी आपल्या केवल ज्ञान ज्योतिने तिन्ही लोकातील सर्व पदार्थाना प्रकाशित केले अशा जिनेंद्र भगवंताना मस्तक नमवून नमस्कार करून निर्जरातत्त्वाचे वर्णन या अधिकारात सांगितले जाते. निर्जरा लक्षण व भेद उपात्तकर्मणः पातो निर्जरा द्विविधा च सा । आद्या विपाकजा तत्र द्वितीया चाविपाकजा ॥२॥ अर्थ- पूर्वी बांधलेले कर्म सत्ता संपल्यानंतर उदयास येऊन निघून जाते त्यास निर्जरा म्हणतात. निर्जरा २ प्रकारची आहे १) सविपाक निर्जरा, २) अविपाक निर्जरा. १ सविपाक निर्जरा लक्षण अनादिबंधनोपाधिविपाकवशतिनः । कारब्धफलं यत्र क्षीयते सा विपाकजा ॥३॥ अर्थ- अनादि बंधन बध्द शक्तीच्या विपाक वश पूर्वी बांधलेले कर्म सत्ता स्थिति संपल्यानंतर उदयास येऊन फळ देऊन निधन जाते त्यास सविपाक निर्जरा म्हणतात. २ अविपाक निर्जरा अनुदीर्णं तपः शक्त्या यत्रोदीर्णोदयावलीं। प्रवेश्य वेद्यते कर्म सा भवत्यविपाकजा ॥४॥ अर्थ- तप शक्तीच्या प्रभावाने पूर्वी बांधलेल्या व सत्तेमध्ये असलेल्या कर्माची स्थिति न संपल्यामुळे जे कर्म अद्यापि उदयावलीत Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy