________________
तत्वार्थसार अधिकार ६ वा
अर्थ - हिंसादि पांच पापरूप सावद्यकर्माचा त्याग करून महाव्रतामध्ये जर काही दोष लागले तर त्याबद्दल यथायोग्य प्रायश्वित्तादि घेऊन पुनः व्रतामध्ये स्थिर होणे यास छेदोपस्थापना चारित्र म्हणतात. ( गुण. ६ ते ९ ).
३ परिहारविशुद्धि चारित्र
विशिष्ट परिहारेण प्राणिघातस्य यत्र हि । शुद्धिर्भवति चारित्रं परिहारविशुद्धि तत् ॥ ४७ ॥
अर्थ - सहाव्या गुणस्थानवर्ती मुनीना तपाच्या प्रभावाने अशी विशिष्ट ऋद्धि ( चारण ऋद्धि ) प्राप्त होते की ज्यामुळे जमिनीवरून अधर गमन करतात. त्यांच्या विहाराने जमिनीवरील प्राण्याचा घात होत नाही अशा ऋद्धि पूर्वक परिणामाची जी विशुद्धि त्याला परिहार विशुद्धि चारित्र म्हणतात. ( गुण. ६-७ )
४ सूक्ष्म सांपराय चारित्र
कषायेषु प्रशान्तेषु प्रक्षीणेस्वखिलेषु वा ।
स्यात् सूक्ष्मसांपरायाख्यं सूक्ष्म लोभवतो मुनेः ॥ ४८ ॥
अर्थ - जेव्हा दाम गुणस्थानवर्ती मुनीना क्रोधादि सर्व कषायांचा उपशम किंवा क्षय होऊन केवळ सूक्ष्म लोभ शिल्लक राहतो त्यामुळे जी परिणाम विशुद्धि होते त्यास सूक्ष्मसांपराय चारित्र म्हणतात. ( गुण १० )
५ यथाख्यात चारित्र
क्षयाच्चारित्र मोहस्य कात्स्न्यें नोपशमात् तथा । यथाख्यात मथाख्यातं चारित्रं पंचमं जिनैः ।। ४९ ।।
१७
अर्थ- संपूर्ण चारित्र मोहनीय कर्माचा उपशम किंवा क्षय झाला असताना जसे आत्म्याचे स्वरूप जिन भगवंतानी सांगितले आहे. तशी परिणामाची पूर्ण विशुद्धि - ( वीतरागता ) प्राप्त होणे त्यास यथाख्यात चारित्र म्हणतात. ( गुण ११ - १२ )
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org