SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 307
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार ६ वा धर्म जिनेंद्र भगवंतानी सांगितला आहे. त्याचे निरंतर अनुशीलन पालन करणे ही धर्मस्वाख्यात तत्वानुचिंतन भावना होय. बाराभावनाचे फल संवर एवं भावयतः साधोर्भवेद् धर्ममहोद्यमः । ततो हि निष्प्रमादस्य महान् भवति संवरः ॥ ४३ ।। अर्थ- याप्रमाणे बारा भावनेचे जो साधु निरंतर प्रमाद रहित होऊन चिंतन करतो त्याला महान् संवराची प्राप्ती होते. संवराचे कारण ५ प्रकारचे चारित्र सामायिकं ज्ञेयं छेदोपस्थापन तथा । परिहारं च सूक्ष्मं च यथाख्यातं च पंचमं ।। ४४ ॥ अर्थ- संवराचे कारण चारित्र त्याचे पाच प्रकार आहेत. १ सामायिक, २ छेदोपस्थापना, ३ परिहारविशुद्धि, ४ सूक्ष्मसांपराय, ५ यथाख्यात चारित्र. १ सामायिक चारित्रस्वरूप प्रत्याख्यानमभेदेन सर्वसावद्यकर्मणः । नित्यं नियतकालं वा वृत्तं सामायिकं स्मृतं ।। ४५ ।। अर्थ- अभेदनयाने सर्व सावद्य क्रियारंभाचा त्याग करून काही नियतकाल किंवा सदासर्वकाल आत्मस्वरूपामध्ये आपला उपयोग स्थिर करणे यास सामायिक चारित्र म्हणतात. (गुणस्थान ६ ते ९) २ छेदोपस्थापना चारित्र स्वरूप यत्र हिंसादिभेदेन त्यागः सावद्यकर्मणः ।। व्रतलोपे विशुद्धिर्वा छेदोपस्थापनं हि तत् ।। ४६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy