________________
तत्वार्थसार अधिकार ६ वा
अर्थ- आपले शरीर असो की दुसऱ्या कोणाचे ही शरीर असो हैं शरीर नाना शेकडो कीटकानी गचपच भरले आहे या शरीरातून नव द्वारातून सारखा मल वाहात आहे. मलाने भरलेले. हे दुर्गंध' शरीर पवित्र कसे असणार ? अशा अपवित्र शरीरावर प्रेम करणे योग्य नाही अशी भावना भावणे ही अशुचित्व भावना होय.
१४
७ आस्रव भावना
कर्माम्भोभिः प्रपूर्णोऽसौ योगध्रसमाहृतः । हा दुरन्ते भवाम्भोधौ जीवो मज्जति पोतवत् ॥ ३७
अर्थ - या संसाररूपी सागरामध्ये ही संसारीजीवरूपी नौका मन-वचन-काय योगरूपी छिद्रातून येणान्या कर्मरूपी पाण्याने परिपूर्ण भरून बुडत आहे. या संसार समुद्रातून तरूत जाणे अत्यंत कठीण आहे. अंशी भावना भावणे ही आस्रव भावना होय.
८ संवर भावना
योगद्वाराणि रुन्धन्तः कपाटैरिव गुप्तिभिः । आपतद्भिर्न बाध्यन्ते धन्याः कर्मभिरूत्कटैः ।। ३८ ।।
अर्थ - मन वचन काय योग प्रवृत्तीला कपाटरूपी गुप्तीच्याद्वारे बंद करून नवीन येणाऱ्या घोर कर्मानी जे बाध्यमान होत नाहीत ते सम्यग्दृष्टी ज्ञानी पुरुष धन्य होत. याप्रमाणे सम्यग्दर्शन सहित गुप्तिसमितिचे पालन करण्याचे परिणाम ठेवण ही संवर भावना होय.
९ निर्जरा भावना
गाढोपजीर्यते यद्वदामदोषो विसर्पणात्
तद्वन्निर्जीर्यते कर्म तपसा पूर्वसंचितं ।। ३९ ।।
अर्थ- ज्याप्रमाणे (विसर्पण) विरेचक औषधीच्याद्वारे शरीरातील पूर्वीचा गाढ महान् आमदोष (अजीर्णाचा दोष ) नष्ट होतो
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org