________________
तत्त्वार्थसारआधिकार ६ वा
३ संसार भावना
चतुर्गति घटीयंत्रे सन्निवेश्य घटीमिव ।
आत्मानं भ्रमयत्येष हा कष्टं कर्मकच्छिक : ॥ ३३ ॥
अर्थ- घटीयंत्राच्या रहाटगाडग्यामध्ये बसलेल्या मनुष्याला जसे ते घटीयंत्र फिरविते त्याप्रमाणे कर्म या जीवाला चतुर्गति रूप घटीयंत्रामध्ये बसवून सारखा चतुर्गतिमध्ये भ्रमण करवीत आहे. याप्रमाणे संसारदुःखाविषयी उद्वेग निर्माण होणे ही संसारभावना होय.
४ एकत्व भावना
कस्यापत्यं पिता कस्य कस्याम्बा कस्य गेहिनी ।
एक एव भवाम्भोधौ जीवो भ्रमति दुस्तरे।। ३४ ॥ अर्थ- या तरून जाण्यास कठीण अशा दुस्तर संसारामध्ये हा जीव एकटाच चतुर्गति भ्रमण करतो. कोण कोणाचा मुलगा, कोण कोणाचा बाप, कोण कोणाची आई, कोण कोणाची स्त्री ही सर्व नाती एकाच भवापुरती असतात. दुसऱ्या भवात त्यांचा काही संबंध राहात नाही.
५ अन्यत्व भावना अन्यः सचेतनो जीवो वपुरन्यदचेतनं ।
हा तथापि न मन्यन्ते नानात्वमनयोर्जना ।। ३५ ॥
अर्थ- जीव सचेतनलक्षण वेगळा आहे. शरीर अचेतन लक्षण वेगळे आहे. तथापि हे अज्ञानी जीव शरीर व आत्मा यांचे अन्यत्व मानीत नाहीत. शरीराविषयी एकत्वबुद्धी मानून संसारात भटकत आहेत.
६ अशुचित्वभावना नानाकृमिशताकीर्णे दुर्गधे मलपूरिते । आत्मनश्च परेषां च क्व शुचित्वं शरीरके ।। ३६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org