________________
तरवार्थसार अधिकार ६ वा
बादर सांपराय-अर्थात् गुणस्थान ६ पासून ९ व्या गुणस्थानापर्यंत २२ परीषह उत्पन्न होऊ शकतात.
परीषहजयाचे फळ संवर निर्जरा संवरो हि भवत्येतानसंक्लिष्टेन चेतसा । सहमानस्य रागादि निमित्तास्वरोधतः ।।२६॥
अर्थ- हे परीषह प्राप्त झाले असताना देखील आत्मज्ञानी मुनि शांतपणाने सहन करतात. संक्लिष्ट परिणाम होऊ देत नाहीत. त्यामुळे रागादिपरीणामामुळे येणारे नवीन कर्म येत नाही. त्यांचा आश्रव निरोध होऊन महान् संवर होतो.
तपाचे फळ संवर व निर्जरा तपो हि निर्जराहेतुरुत्तरत्र प्रचक्ष्यते । संवरस्यापि विद्वांसो विदुस्तन्मुख्य कारणं ॥२७॥ अनेककार्यकारित्वं म चैकस्य विरुध्यते ।
दाहपाकादि हेतुत्व दृश्यते हि विभावसोः ॥२८॥
अर्थ- तप हे निर्नरचे कारण आहे असे पुढील निर्जरा अधिकारात सांगणार आहेत. परंतु तप हे संबर।चे देखील मुख्य कारण आहे असे विद्वान् लोक मानतात. एक वस्तु अनेक कार्याचे कारण होऊ शकते त्यात काही विरोध येत नाही. एकच अग्नि हा (दाह) जाळणे व ( पाक ) अन्नादि शिजविणे इत्यादि अनेक कार्य करणारा दिसून येतो. त्याप्रमाण तप हे संवर व निर्जरा या दोघांचे कारण मानण्यात विरोध येत नाही.
बारा अनुप्रेक्षा अनित्यं शरणाभावो भवश्चैकत्व मन्यता । अशौचमाशवश्चैव संवरो निर्जरा तथा ॥२९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org