SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 301
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १० तत्त्वार्थसार अधिकार ६ वा २०) प्रज्ञा परीषह- आपल्या विशेष ज्ञानाचा अभिमान न बाळगणे यास प्रज्ञा परीषहजय म्हणतात. २१) अज्ञान परीषह- दुसऱ्या ज्ञानवान् लोकाकडून आपल्या अज्ञान दोषा बद्दल जर निंदा झाली तर ती सहन करणे यास अज्ञानपरीषहजय म्हणतात. २२) अदर्शन परीषहय- घोरतपश्चरण करूनही जर कार्यसिद्धि झाली नाही तर मोक्षमार्गाला दोष न लावणे यास अदर्शन परीषहजय म्हणतात. या बावीस परीषहापैकी शीत-उष्ण यापैकी एक, चर्या-निषद्याशय्या यापैकी कोणताही एक असे तीन परीषह सोडून युगपत् जास्तीतजास्त १९ परीषह प्राप्त होऊ शकतात. १) ज्ञानावरण कर्माच्या उदयाने प्रज्ञा व अज्ञान परीषह उत्पन्न होतात. २) दर्शन मोहनीयाच्या उदयाने अदर्शन परीषह उत्पन्न होतो. ३) अंतरायकर्माच्या उदयाने अलाभ परीषह उत्पन्न होतो. ४) चारित्रमोहकर्माच्या उदयाने नाग्न्य, अरति, स्त्री, निषद्या, आक्रोश याचना असत्कार-पुरस्कार हे ७ परीषह उत्पन्न होतात. ५) वेदनीय कर्माच्या उदयाने वाकीचे ११ परीषह उत्पन्न होतात. गुणस्थान ११-१२ सूक्ष्मसापराय व छद्मस्थ वीतराग उपशांत मोह क्षीणमोह या गुणस्थानात- क्षुधा, तृषा, शीत उष्ण दंशमशक चर्याशय्या, वध-अलाभ-रोग-तृणस्पर्श-मल, प्रज्ञा-अज्ञान हे १४ परीवह उत्पन्न होऊ शकतात. गुणस्थान १३- के वाली गाना- वेदनीयकर्माचा सत्तामात्र उदय असल्यामुळे नाममात्र तज्जनित ११ परीषह सांगितले आहेत. वास्तविक मोहनीय कर्माच्या अभावात वेदनीय कर्माचे फट सुख-दुःख क्षुधादिकपरीषह भगवंताना नसतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy