________________
तत्वार्थसार अधिकार ६ वर
९) चर्यापरीषह - दीर्घकाल गमन करीत असताना जे श्रम होतात जे दुःख होते ते सहन करणे त्यास चर्या - परीषहजय म्हणतात.
१० ) निषद्यापरीषह - दीर्घकाळ एका आसनाने बसले असता होणारे दुःख सहन करणे यास निषद्या परीषहजय म्हणतात.
११) शय्यापरीषह - एका अंगावर संकुचित अंगकरून झोपले असताना होणारे दुःख सहन करणे यास शय्या परीषहजय म्हणतात.
१२) आक्रोशपरीषह - दुसन्याने उपसर्ग केला असताना त्याबद्दल आक्रोश न करणे यास आक्रोश परीषहजय म्हणतात.
१३ ) वधपरीषह - दुसन्याने ताडन मारण उपसर्ग केला असताना होणारे दुःख सहन करणे यास वधपरीषहजय म्हणतात.
१४) याचना परीषह - आहार, औषध इत्यादी विषयी याचना न करणे यास याचना परीषहजय म्हणतात.
१५) अलाभपरीषह - आहारादि वसतिकास्थान इत्यादिकाचा लाभ न झाल्यामुळे होणारी बाधा सहन करणे यास अलाभ परीषहजय म्हणतात.
१६ ) रोगपरीषह - शरीरात वात पित्तादि रोग उत्पन्न झाले असताना होणारे दुःख सहन करणे यास रोग परीषहजय म्हणतात. १७) तृणस्पर्शपरीषह - चालताना पायात खडे - चिपरे - काटे टोचत असताना होणारे दुःख सहन करणे यास तृणस्पर्श परीषहजय म्हणतात.
१८) मलपरीषह - शरीरावर घामामुळे मल उत्पन्न झाला असताना होणारे दुःख सहन करणे त्यास मलपरीषहजय म्हणतात.
१९ ) असत्कार पुरस्कार परीषह- दुसयानी कोणी सत्कारपुरस्कार केला नाही, मान-सन्मान केला नाही, अपमान केला तरी त्याबद्दल खेद न वाटू देता तो सहन करणे. यास असत्कार-पुरस्कार परीषहजय म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org