________________
तत्त्वार्थसार अधिकार ६ वा
१) क्षुधा परीषह - अहिंसा धर्मांचे पालन होण्यासाठी, आत्मस्वरूपात स्थिर राहण्यासाठी चारही प्रकारचा ( खाद्य स्वाद्यपेय-- ) आहाराचा त्याग करणे यास उपवास म्हणतात.
आत्मस्वरूपात राहणे हा निश्चय उपवास. आहाराचा त्याग हा व्यवहार उपवास. उपवास धारण केला असताना, अथवा अंतराय आला असताना जी क्षुधेची बाधा उत्पन्न होते ती सहन करणे तो क्षुधा परीष हजय होय.
२) पिपासा परीषह - पित्त आदिक दोष उत्पन्न झाले असताना, प्रकृतीविरुद्ध आहार मिळाला तर जी तृषेची बाधा उत्पन्न होते ती सहन करणे हा तृषापरीषहजय होय.
३) शीत परीषह - थंडीचे दिवसात थंडीची बाधा उत्पन्न होते ती सहन करणे ( थंडीचे दिवसात नदीचे काठी जाऊन थंडीची बाधा सहन करणे. तो शीत परीषहजय होय.
--
४) उष्ण परीषह - गरमीचे दिवसात उष्णतेची बाधा सहन करणे ( गरमीचे दिवसात पहाडाचे शिखरावर जाऊन उष्ण शिलेवर बसून ध्यान करणे तो उष्ण परीषहजय होय.
५) दंशमशक परीषह - डांस, मच्छर इत्यादिकाचा उपसर्ग सहन करणे त्यास दंशमशक परीपहजय म्हणतात.
६ ) नाग्न्य परीषह - नग्नता धारण केली असताना लहान बालकाप्रमाणे मनामध्ये विकार उत्पन्न न होणे यास नाग्न्य परीषहजय म्हणतात.
७) अरति परीषह - बाह्य अनिष्ट पदार्थाच्या रोगादिकाचा संयोग झाला असल्यास त्या बद्दल द्वेष न करणे या अरतिपरीष हजय म्हणतात.
८) स्त्रीपरीषह - स्त्रीला पाहून कामविकार उत्पन्न न होऊ देणे घास स्त्री परीषहजय म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org