SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 295
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार ६ वा अर्थ- उद्गम-उत्पादना आदि दोष शुद्धीचे पालन करीत भोजन, उपाधि- पिछी-कमंडलु वगैरे शुद्धीचे उपकरण बसण्या उठण्याचे व झोपेचे आसन चटई, पाट वगैरे यांचा वापर करीत असताना जीव-जंतु प्राणिवध न होईल अशी सावधानता ठेवणे ती एषणा समिति होय. आदान-निक्षेपण समिति सहसाऽदृष्ट-दुर्मुष्ट प्रत्यवेक्षण दूषणं । त्यजतः समितिञ्जेयाऽऽदाननिक्षेपगोचरा ॥ १० ॥ अर्थ- घाईने सहसा एकदम न पाहता, न झाडता, जीवजंतूचे निरीक्षण न करता पिछी-कमंडलु-शास्त्र आदि उपकरण वस्तू घेणे- ठेवणे त्याग करणे, अर्थात् पिंछीने परिमार्जन करून कोणतीही वस्तु उचलणे किंवा ठेवणे यास आदान निक्षेपण समिति म्हणतात. उत्सर्ग समिति समितिशिताऽनेन प्रतिष्ठापनगोचरा । त्याज्यं मूत्रादिकं द्रव्यं स्थण्डिले त्यजतो मुनेः ।। ११ ॥ अर्थ- उपरोक्त विधीने अर्थात् जीवजंतुचा वध न होईल अशी सावधानता पूर्वक निर्जन्तुक अशा प्रासुक भूमीवर मल-मूत्रादि विसर्जन करणे याला प्रतिष्ठापन समिति अथवा उत्सर्ग समिति म्हणतात. समितिचे फल इत्थं प्रवर्तमानस्य न कर्माण्यासवन्ति हि। असंयमनिमित्तानि ततो भवति संवरः ।। १२ ॥ अर्थ- या प्रमाणे सावधानपूर्वक समितिचे पालन करणा-याला असंयम निमित्तक कर्माचा आस्रव होत नाही त्यामुळे आस्रव निरोध झाल्यामुळे संवर होतो. दहा धर्माची नावे क्षमा मृद्वजुते शौचं ससत्यं संयमस्तपः । त्यागोऽकिंचनता ब्रह्म धर्मो दशविधः स्मृतः ।। १३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy