SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 296
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार ६ वा अर्थ- उत्तम क्षमा- मार्दव- आजव- शौच- सत्य- संयम- तप- त्याग आकिंचन्य व ब्रह्मचर्य हा दहा प्रकारचा धर्म आहे. क्षमा धर्म क्रोधोत्पत्ति निमित्तानामत्यन्तं सति संभवे। आक्रोश ताडना दीनां कालुष्योपरमः क्षमा ॥ १४ ॥ अर्थ- आक्रोश-ताडन मारण-आदि क्रोधाच्या उत्पत्तीचे कारण उपस्थित असताना देखील कलुषित परिणाम न होऊ देणे त्यास क्षमा धर्म म्हणतात. मार्दव धर्म अभावो योऽभिमानस्य परैः परिभवे कृते । जात्यादीनामनावेशान्मदानां मार्दवं हि तत् ॥ १५ ॥ अर्थ- दुस-यानी आपला अपमान पराभव केला असताना जाति, कुल, इ. अभिमानवश गर्व उत्पन्न न होणे यास मार्दव धर्म म्हणतात. आर्जव धर्म वाङमनः काय योगानामवक्रत्वं तदार्जवं ।। अर्थ- मन-वचन-काय- प्रवृत्तीमध्ये मायाचार-कुटिलता नसणे यास आर्जव धर्म म्हणतात. मन वचन कायेच्याद्वारे सचोटीचा सत्य सरळ व्यवहार करणे तो आर्जव धर्म होय. शौच धर्म परिभोगोपभोगत्वं जीवितेन्द्रिय भेदतः । चतुर्विधस्य लोभस्य निवृत्तिः शौचमुच्यते ।। १६ ॥ अर्थ- दासी-दास- व स्त्रीअलंकार आदि वस्तू परिभोग, भोजनचंदन- लेपन इत्यादि भोग वस्तू, जीवित व पंचेंद्रियाचे विषय भोग या चार प्रकारच्या वस्तूविषयी मूर्छा- ममत्व भाव त्याला लोभ म्हणतात. लोभ परिणामापासून निवृत्ति तो शौचधर्म होय. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy