SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 294
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तस्वार्थसार अधिकार ६ वा असताना, उपयोगशुद्धि पूर्वक, आलंब्यशुद्धि गमनकरण्याचा उद्देश पवित्र भावना ठेवून गमन करणे ही मुनीची ईर्यासमिति म्हटली जाते. भाषा समिति लक्षण व्यलीकादि विनिर्मुक्तं सत्यासत्यामृषाद्वयं । वदतः सूत्रमार्गेण भाषासमिति रिष्यते ॥ ८ ॥ अर्थ - शास्त्रात सांगितलेल्या विधिपूर्वक असत्य व उभय ( सत्यासत्य ) हे दोन प्रकारचे वचन न बोलता केवळ सत्य व अनुभय ( असत्य - मृषा ) असे दोन प्रकारचे वचन बोलणे याला भाषासमिति म्हणतात. विशेषार्थ - शास्त्रात भाषेचे ४ प्रकार सांगितले आहेत. १ सत्य - हित, मित, प्रिय वचन बोलणे ते सत्यवचन होय. २ असत्य - अहितकारक, अप्रिय, असे खोटे वचन बोलणे ते असत्य वचन होय. ३ ३ उभय- कपटपूर्वक असत्यभावना पूर्वक सत्यवचन बोलणे ते उभय वचन होय. ४ अनुभय- ज्यामध्ये सत्य-असत्याची भावना विवक्षा नसते जसे आमंत्रण याचना पृच्छा ( प्रश्न विचार ) आदेश - उपदेश इ. जे वचन ते अनुभय वचन होय, या पैकी असत्य व उभय हे दोन प्रकारचे वचन हिंसामूलक असल्यामुळे बोलणे पाप आहे मुनि लोक प्रयोजनवश सत्य व अनुभय हे दोन प्रकारचे वचन च बोलतात. त्याबद्दल यथोचित प्रतिक्रमण प्रायश्चित करतात. एषणा समिति पिण्डं तथोर्पाधि शय्यामुद्गमोत्पादनादिना । साधोः शोधयतः शुद्धा ह्येषणा समितिर्भवेत् ॥ ९ ॥। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy