________________
तृतीय खंड
अधिकार ६ वा संवर तत्व वर्णन
मंगलाचरण अनन्त केवलज्योतिः प्रकाशितजगत्त्रयं ।
प्रणिपत्य जिनान् मूर्ना संवरः संप्रचक्ष्यते ॥ १॥
अर्थ- ज्यानी आपल्या अनन्त ज्ञानरुपी केवलज्ञान ज्योतिने तिन्ही जगाला प्रकाशित केले आहे अशा सर्वज्ञ जिनेंद्र भगवंताना मस्तक नमवून नमस्कार रूप मंगल करून संवरतत्त्वाचे वर्णन या अधिकारात केले जाते.
संवरलक्षण यथोक्तानां हि हेतूनामात्मनः सति संभवे ।
आसवस्य निरोधो यः स जिनैः संवरः स्मृतः ।। २ ॥ अर्थ- जीवाच्या ज्या शुद्ध स्वभाव परिणामांचा सद्भाव असताना नवीन कर्माच्या आस्रवाचा निरोध होतो त्या परिणामास सर्वज्ञ जिनेंद्र भगवंतानी संवर म्हटले आहे.
संवराची कारणे गुप्तिः समितयो धर्माः परीषहजयस्तपः ।
अनुप्रेक्षाश्च चारित्रं सन्ति संवरहेतवः ॥ ३ ।।
अर्थ- ३ गुप्ति, ५ समिति, १० धर्म, २२ परीषहजय, १२ तप, १२ अनुप्रेक्षा व ५ प्रकारचे चारित्र ही संवराची कारणे आहेत.
___ गुप्तिचे स्वरूप योगानां निग्रहः सम्यग् गुप्तिरित्यभिधीयते । मनोगुप्तिर्वचोगुप्तिः कायगुप्तिश्च सा त्रिधा ॥ ४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org