________________
पंचम अधिकार
पुण्य-पाप रूपाने बंधाचे भेद शुभाशुभोपयोगाख्य निमित्तो द्विविधस्तथा ।
पुण्य-पापतया द्वेधा सर्व कर्म विभिद्यते ॥५१॥
अर्थ- जीवाच्या शभोपयोग व अशभोपयोगाच्या निमित्ताने आस्रव-बंधरूपाने जीवाशी एकरूप बद्ध झालेले कर्मपरमाणू पुण्यकर्म व पापकर्मरूपाने दोन प्रकाराने व ज्ञानावरणादि आठ प्रकृतिभेद रूपाने विभागले जातात
पुण्य प्रकृतीची नावे
उच्चैर्गोत्रं शुभायूंषि सवेद्यं शुभनाम च ।। द्विचत्वारिंशदित्येवं पुण्य प्रकृतयः स्मृताः ॥५२॥
अर्थ- १ उच्चगोत्र, ३ आयुकर्म, (देव-मनुष्य-तिर्यंच) १ सातावेदमीय व नामकर्माच्या ३७ (अभेदविवक्षेने) ६३ (भेदाविवक्षेने) एकूण बंधाच्या अपेक्षेने अभेदाविवक्षेने ४२ पुण्यप्रकृति आहेत भेदविवक्षेने ६८ पुण्य प्रकृति आहेत. (नामकर्माच्या अभेद विवक्षेने ४५ प्रकृति, व भेदविवक्षेने ६३ प्रकृति ) २ मनुष्यगति-मनुष्यगत्यानुपूर्वी, २ देवगतिदेवगत्यानुपूर्वी पंचेंद्रिय जाति, ५ औदारिकादि शरीरभेद विवक्षेने (५ बधन ५ संघात,) ३ अंगोपांग, ४ वर्णादिक ( अभेद विवक्षने ) भेदविवक्षेने २० प्रकृति ५ समचतुरस्र संस्थान, १ वज्रर्षभ नाराच संहनन, अगुरुलघु, परघात, उच्छ्वास, आतप, उद्योत, प्रशस्तविहायोगति त्रस, बादर, पर्याप्तक, प्रत्येक शरीर, स्थिर, शुभ, सुभग, सुस्वर, आदेय यशःकीति, निर्माण, तीर्थक र.
पाप प्रकृतिचे भेद नीचर्गोत्रमसवेद्यं श्वभ्रायुर्नामचा शुभं । व्यशीतिर्घातिभिः साध्द पापप्रकृतय स्मृताः ।। ५३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org