________________
१०२
तत्वार्थसार
जीवाचे परिणाम ३ प्रकारचे होतात. १ संक्लेश ( तीव्रराग ) २ विशुद्ध (मंदराग) ३ शुद्ध (वीतराग). १ संक्लेश परिणामानी पाप प्रकृतीचा उत्कृष्ट अनुभाग बंध होतो. २ विशुद्ध परिणामानी पुण्य प्रकृतीचा उत्कृष्ट अनुभाग बंध होतो. ३ वीतराग शुद्ध परिणामानी संवर-निर्जरा होते. अनंतानुबंधी आदि चार कषाय परिणामाच्या अपेक्षेने घाति कर्मांच्या अनुभाग शक्तीना शिला (पाषाण) अस्थि (हाड, दारु-लता (लाकूड) या चार उपमा दिल्या आहेत. अघाति कर्माच्या पुण्यप्रकृतीच्या अनुभाग शक्तीना गूळ, खांडसरी साखर, पिठीसाखर, अमृत या चार उपमा दिल्या आहेत. अघाति कर्माच्या पापप्रकृतींच्या अनुभाग शक्तीना निंब, कांजीर, विष, हालाहल विष या चार उपमा दिल्या आहेत.
प्रदेशबंधाचे स्वरूप
घनांगुलस्यासंख्येयभागक्षेत्राव गाहिन। ।। ४७ ।। एक-द्वि-त्र्याधसंख्येय समयस्थितिकास्तथा । उष्ण-रूक्ष-हिम-स्निग्धान सर्ववर्णरसान्वितान् ॥ ४८ ।। सर्वकर्म प्रकृत्यर्हान् सर्वेष्वपि भवेषु यत् । द्विविधान् पुद्गलस्कंधान सूक्ष्मान् योग विज्ञेषतः ॥ ४९ ॥ सर्वेष्वात्म प्रदेशेष्वनन्तानन्त प्रदेशकान् । आत्मसात् कुरुते जीव: स प्रदेशोऽभिधीयते ॥ ५० ।।
अर्थ- घनांगलाच्या असंख्याताव्या भागप्रमाण क्षेत्रादगाहस्थितएक-दोन-तीन आदि संख्यात-असंख्यात समय स्थितिला जे धारण करतात उष्ण-शीत, स्निग्ध-रुक्ष स्पर्श व सर्ववर्ण, सर्व रस, दोनगंध या पुद्गल गुणाना धारण करतात, पुण्य व पाप रूप दोन प्रकारच्या कर्माणवर्गणा सूक्ष्म स्कंधपरमाणूना जीव आपल्या योगशक्ति विशेष सामर्थ्याने सर्व आत्मप्रदेशामध्ये समय प्रबद्ध प्रमाण अनन्तानन्त परमाणना प्रतिसमय ग्रहण करतो त्याला प्रदेशबंध म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org