________________
पंचम अधिकार
अर्थ- ज्ञानावरण-दर्शनावरण-वेदनीय व अंतराय या चार कर्मांची उत्कृष्ट स्थिति ३० कोडाकोडीसागर आहे. मोहनीय कर्माची उत्कृष्टस्थिति ७० कोडाकोडी सागर आहे. नाम व गोत्र कर्माची उत्कृष्ट स्थिति २० कोडाकोडीसागर आहे. आयुकर्माची उत्कृष्ट स्थिति ३३ सागर आहे.
कर्माचा जयन्य स्थितिबंध मुहूर्ता द्वादश ज्ञेया वेद्येऽष्टौं नामगोत्रयोः ॥ ४५ ।। स्थिति रन्तर्मुहूर्तस्तु जघन्या शेषकर्मसु ।।
अर्थ- वेदनीय कर्माची जघन्य स्थिति १२ मुहूर्त नाम व गोत्र कर्माची सघजस्थिति ८ मुहूर्त बाकीच्या कर्माची जघन्य स्थिति अन्तर्मुहूर्त आहे. (मुहूर्त = ४८ मिनिटे)
अनुभाग बंध विपाकः प्रागुपात्तानां यः शुभाशुभकर्मणां ॥ ४६ ।।
असावनुभवो ज्ञेयो यथानाम भवेच्च स: ।
अर्थ- पूर्वी बांधलेले कर्म स्थिति संपल्यानंतर जेव्हा उदयास येऊन फल देऊन निघून जाते त्या कर्मफलास अनुभाग बंध म्हणतात. कर्माच्या ज्या मल व उत्तर प्रकृति आहेत त्यांच्या त्यांच्या नावाप्रमाणे त्या प्रकृति उदयास येऊन फल देतात.
__भावार्थ- प्रत्येक समयाला सिद्धराशिच्या अनन्तावा भाग व अभव्य राशिच्या अनन्तपट समयप्रबद्ध प्रमाण कर्म परमाणूचा जोवाशी बंध होतो. कर्माचा बंध झाल्यानंतर कर्माचा जो स्थितिबंध असतो त्याच्या योग्य प्रमाणात आबाधा काळ असतो. जो पर्यंत बांधले गेलेले कर्म उदयास येण्यास सुरुवात होत नाही त्यास आबाधा काल म्हणतात. सामान्यत: आबाधा काळाचे प्रमाण. एक कोडाकोडीसागर स्थितीचा आवाधाकाल १०० वर्ष याप्रमाणे असतो. आबाधाकाल संपल्यानंतर ज्यांची स्थिति कमी असते ते कर्मपरमाणू निषेक अनुक्रमाने उदयास
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org