________________
१००
तत्वार्थसार
येऊन फल देऊन अथवा फल न देता तसेच निमूटपणे जीवापासून निघून जातात.
सर्व कर्मांच्या जघन्य स्थितिचा आबाधाकाल स्थितीचा संख्याताधा भाग प्रमाण असतो. आयुकर्माचा आबाधाकाल आयुस्थितिच्या तृतीयांश भागापासून असंक्षेपाद्धाकाल- अर्थात् आवलीच्या असंख्यातवा भागप्रमाण असतो. जीवाच्या परिणाम निमित्त वश कर्मस्थिति संपण्याच्या अगोदर कर्म उदयास येणे यास उदीरणा म्हणतात. सर्व कर्माचा उदीरणाच्या अपेक्षेने आबाधाकाल एक आवलीप्रमाण आहे.
ज्या कर्माचा जो स्थितिकाल असेल त्याचा अबाधावाल संपेपर्यत बांधलेले कर्म उदयास येत नाही. आबाधकाल संपल्यानंतर ज्यांची स्थिति संपते त्या कर्म परमाणूंची निषेक रचना होते. उदयास येण्यास तयार असलेल्या कर्म परमाणूना निषेक म्हणतात. निषेक रचनानुसार कर्म परमाणु उदयास येऊन जीवापासून निघून जातात. प्रथम निषेकामध्ये सर्वात जास्त कर्म परमाणू खिरतात. नंतर पुढच्या पुढच्या निष्कामध्ये गुणहानिक्रमानुसार गुणाकार रूपाने हीन हीन कर्म परमाणू खिरतात. गुणहानिक्रम अनेक प्रकारचा असतो त्याला नाना गुणहानि म्हणतात. पहिल्या गुणहानि पेक्षा पुढच्या गुणहानिमध्ये उदयास येणारे निषेक प्रदेश संख्येने निम्पट निम्पट उदयास येऊन खिरतात
जसे- उदाहरणार्थ एका समयात बांधले गेलेले परमाणु ६३०० आहेत तर त्यांची उदयास येताना निषेक रचना खालील प्रमाणे होते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org