SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 283
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार सुस्वर- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाचा आवाज सुस्वर कर्णमधुर-गोड आवाज प्राप्त होतो त्यास सुस्वर नामकर्म म्हणतात. दुःस्वर- ज्या नाम कर्माच्या उदयाने जीवाचा आवाज दुःस्वरकर्णकटु कठोर-भेसूर प्राप्त होतो त्यास दुःस्वर नामकर्म म्हणतात. सुभग- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाच्या शरीराचे सुंदर रूप पाहून सर्वाना प्रेम उत्पन्न होते त्यास सुभग नामकर्म म्हणतात. दुर्भग-- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाचे कुरुप शरीर पाहून किळस उत्पन्न होतो त्यास दुर्भग नामकर्म म्हणतात. आदेय- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाचे शरीर कांतिमान तेज-पुंज असते त्यास आदेय नामकर्म म्हणतात. अनादेय- ज्या नामकर्मांच्या उदयाने जीवाचे शरीर निस्तेजभेसूर असते त्यास अनादेय नामकर्म म्हणतात. यशःकीति- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाची सर्व लोकात कीर्ति होते, मान-सन्मान होतो त्यास यशःकीति नामकर्म म्हणतात. अयश:कीर्ति - ज्या कर्माच्या उदयाने जीवाची सर्व लोकात अप. कीर्ति होणे-अनादर-निंदा-गर्दा होणे त्यास अयशःकीर्ति नामकर्म म्हणतात तीर्थकर नामकर्म- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाला तीर्थकर अवस्था प्राप्त होते त्यास तीर्थकर नामकर्म म्हणतात. गोत्र कर्माचे भेद गोत्रकर्म द्विधा ज्ञेयमुच्च-नीच प्रभेदतः । अर्थ- गोत्र कर्माचे २ भेद आहेत. १ उच्चगोत्र २ नीचगोत्र १ उच्च गोत्र- ज्या कर्माच्या उदयाने जीवाचा जन्म धर्माचे पालन करणा-या उच्च-पवित्र कुलात होतो त्यास उच्च गोत्र म्हणतात. २ नीचगोत्र- ज्या कर्माच्या उदयाने जीवाचा जन्म अधर्म कृत्य Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy